Nagar | जनशक्ती श्रमिक संघाचा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा

नगर, (प्रतिनिधी) – बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्य संच द्यावे. तसेच नवीन नूतनीकरण अर्ज मंजूर करून नवीन नोंदीत प्रकरण मंजूर करावे तसेच कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात यावी.
बांधकाम कामगारांना ५ हजार रुपये निवृत्ती वेतन देण्यात यावे, अशा विविध मागण्यासाठी नगर येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर जनशक्ती श्रमिक संघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
यावेळी जनशक्ती श्रमिक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवाजीराव काकडे समवेत हर्षदा काकडे, अध्यक्ष संजय दुधाडे, सचिव अकबर शेख, भाऊसाहेब राजळे, भागचंद कुडकर, तुकाराम ढाकणे, भारत लांडे,
मनोज घोंगडे, आबासाहेब काकडे, नवनाथ वीर, नामदेव ढाकणे, विश्वास ढाकणे, विजय दळवी, गीताराम लांडे, सुखदेव जाधव, एकनाथ ढाकणे, शोभा पन्हाळे, मनीषा बोडके, सुरेखा पानफळ, अलका पानफळ, सीमा पानफळ आदीसह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनशक्ती श्रमिक संघ शेवगाव पाथर्डी संघटनेच्या हजारो नोंदीत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्य संच अद्यापही मिळालेले नाही.
शेवगाव व पाथर्डी तालुक्यात राजकीय पक्षांच्या दबावामुळे अनेक ठिकाणी गृहउपयोगी संच वाटपाचे कॅम्प लावून वितरण करण्यात आले.
परंतु जनशक्ती श्रमिक संघ शेवगाव पाथर्डी या संघटनेचे तालुक्यावरील हजारो नोंदीत व जिवंत बांधकाम कामगारांना अद्यापही ग्रुहउपयोगी साहित्य संच राजकीय आकास धरून मिळत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.





