सुरक्षा दलाची मोठी कारवाई ! पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे घर बॉम्ब अन् बुलडोझरने केले नेस्तनाबूत

Jammu Kashmir Terror Attack । अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेला स्थानिक दहशतवादी आदिल हुसेन ठोकर याच्या घरावर सुरक्षा दलांनी बॉम्बहल्ला केला. आदिल ठोकर उर्फ आदिल गुरी असे ओळखल्या जाणाऱ्या या दहशतवाद्यावर २२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या हल्ल्याचे नियोजन,अंमलबजावणी करतपाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे. त्याच वेळी, या हल्ल्यात सहभागी असलेला आणखी एक स्थानिक दहशतवादी आसिफ शेख याचे त्राल येथील घर जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने बुलडोझरने नेस्तनाबूत करण्यात आले आहे.
लष्कराकडून समोर आलेल्या माहितीनुसार, २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे स्टीलच्या गोळ्या, एके-४७ रायफल्स आणि बॉडी कॅमेरे घातलेल्या चार लष्कर-ए-तैयबा (एलईटी) दहशतवाद्यांच्या गटाने हिंदू पर्यटकांना लक्ष्य केले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला, त्यापैकी बहुतेक पर्यटक होते आणि ते भारतातील विविध राज्यांमधून जम्मू आणि काश्मीरला भेट देण्यासाठी आले होते. दहशतवाद्यांमध्ये दोन स्थानिकांचाही समावेश होता. सूत्रांनी सांगितले की, दोन्ही स्थानिक दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. त्यांची नावे आदिल हुसेन ठोकर, रहिवासी बिजबेहरा आणि आसिफ शेख, रहिवासी त्राल अशी आहेत.
आदिल २०१८ मध्ये पाकिस्तानला गेला आणि तिथे प्रशिक्षण घेतले Jammu Kashmir Terror Attack ।
लष्करी सूत्रांनुसार, आदिल २०१८ मध्ये अटारी-वाघा सीमेवरून कायदेशीररित्या पाकिस्तानात गेला होता. पाकिस्तानमधील वास्तव्यादरम्यान त्याने एका दहशतवादी छावणीत प्रशिक्षण घेतले आणि गेल्या वर्षी तो जम्मू आणि काश्मीरला परतला. पहलगाम हल्ल्यातील काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, काही दहशतवादी पश्तून भाषेत आपापसात बोलत होते. हल्ल्यात सहभागी असलेले सर्व दहशतवादी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचे होते, असे सूत्रांनी जोर देऊन सांगितले. मात्र , द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने देखील या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ते म्हणाले की टीआरएफ हा लष्कर-ए-तैयबाचा एक प्रमुख दहशतवादी गट आहे, ज्याचा वापर हा हल्ला एका स्थानिक गटाचे काम म्हणून दाखवण्यासाठी करण्यात आला होता.
Home of Pahalgam terrorist Asif Sheikh demolished in Tral, reports @nazir_masoodi. There were at least 4 others, including Aadil Thakur of Bijbehara and two Pakistani national terrorists. pic.twitter.com/UOABb0Jic1
— Shiv Aroor (@ShivAroor) April 25, 2025
दहशतवादी खूप पूर्वी जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसले होते आणि त्यांची योजना १९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कटरा दौऱ्यादरम्यान हल्ला करण्याची होती, जी त्यांनी नंतर काही कारणास्तव रद्द केली असल्याचे सांगण्यात येत आहे. कोणत्याही गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या गटाला लक्ष्य करण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे सूत्रांनी नाकारले. त्यांनी सांगितले की, इंटेलिजेंस ब्युरोचा एक कर्मचारी (मनीष रंजन, जो बिहारचा रहिवासी आहे आणि हैदराबादमध्ये तैनात आहे) त्याच्या कुटुंबासह सुट्टीसाठी आला होता आणि तो मारला गेलेल्यांमध्ये होता.
दहशतवाद्यांनी हिंदूंना लक्ष्य केले Jammu Kashmir Terror Attack ।
दहशतवादी बैसरन व्हॅलीच्या गवताळ प्रदेशात आले होते, ज्याला मॅगी पॉइंट किंवा मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाते. त्यांच्याकडे बॉडी कॅमेरे आणि एके-४७ रायफल्स होती. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची नावे विचारली आणि हिंदूंना लक्ष्य केले. हल्ल्याच्या ठिकाणाहून जप्त केलेल्या काडतुसांमध्ये चिलखत छेदणाऱ्या गोळ्या, ज्यांना स्टील बुलेट असेही म्हणतात, देखील सापडल्या. सूत्रांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी सुमारे १५ मिनिटे गोळीबार केला आणि निष्पाप लोकांची कत्तल केली. लष्करी सूत्रांनुसार, दहशतवादी गट सहसा सहा सदस्यांच्या गटासह असे हल्ले करतात आणि पहलगाम हल्ल्यात आणखी एक किंवा दोन दहशतवादी सहभागी असण्याची शक्यता आहे, ज्यांना पाळत ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले होते. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दलांनी मोठी मोहीम सुरू केली आहे. विशेष दल देखील तैनात करण्यात आले आहे.





