बारामुल्ला चकमकीत 2 दहशतवादी ठार
Updated On:

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांना ठार केले. ती चकमक बारामुल्ला जिल्ह्यात घडली. त्यामध्ये सुरक्षा दलांचे 2 जवान जखमी झाले. बारामुल्लामध्ये एका ठिकाणी दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि लष्करी जवानांनी संयुक्तपणे शोधमोहीम हाती घेतली. त्या मोहिमेवेळी पोलीस आणि जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.
त्याला पोलीस, जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख तातडीने पटू शकली नाही. चकमकीत सुरक्षा दलांकडील पोलीस आणि जवान असे मिळून दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या प्रकृतीला कुठलाही धोका नसल्याचे समजते.





