जम्मू :-जम्मू-काश्मीरमधील मतदारांची अंतिम यादी शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. (J&K’s final electoral rolls to be published today) त्यामुळे त्या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अंतिम यादीनुसार जम्मू-काश्मीरमधील मतदारांमध्ये 7.72 लाख इतकी भर पडली. त्यामुळे त्या केंद्रशासित प्रदेशातील एकूण मतदारांची संख्या 83 लाख 59 हजार 771 इतकी झाली आहे.
अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक केव्हा होणार याविषयीची उत्सुकता बळावेल. गुजरात निवडणुकीबरोबरच ती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तसे घडले नाही.
आता पुढील काही दिवसांत निवडणूक आयोगाकडून जम्मू-काश्मीरमधील रणसंग्रामाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथील राजकीय वातावरण तापेल. केंद्र सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्दबातल केला.
Delhi Excise Case : CBI कडून 7 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल; विशेष म्हणजे मनीष सिसोदियांचे….
त्यानंतर केंद्रशासित प्रदेश म्हणून जम्मू-काश्मीर प्रथमच विधानसभा निवडणुकीला सामोरा जाईल. तेथील काही भाजपेतर प्रमुख पक्ष आघाडी करून निवडणूक लढवण्याची चाचपणी करत आहेत. तशी आघाडी अस्तित्वात येणार का याविषयीही उत्सुकता असेल.