Jamkhed News :जामखेड पोलिसांची धडक कारवाई; दुकानातील चोरीचा गुन्हा २४ तासांत उघडकीस, २ आरोपी अटकेसह मुद्देमाल जप्त!
Jamkhed News : जामखेड शहरातील जयहिंद चौकातील किराणा दुकानात झालेली चोरी उघडकीस आणण्यात जामखेड पोलिसांना यश आले आहे.

Jamkhed News : जामखेड शहरातील जयहिंद चौकातील किराणा दुकानात झालेली चोरी उघडकीस आणण्यात जामखेड पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या २४ तासांच्या आत या चोरीचा छडा लावून २ आरोपींना अटक केली आहे, तर २ आरोपी सध्या फरार आहेत. (Jamkhed News)
२६ ऑगस्टच्या रात्री ते २७ ऑगस्टच्या सकाळी ८ वाजेच्या दरम्यान, जयहिंद चौक येथील ‘सचिन प्रोव्हिजन स्टोअर्स’ या किराणा दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश केला होता. चोरट्याने दुकानातील ५४,१०० रुपये किमतीचे किराणा साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५(a), ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. (Jamkhed News)
गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीने जामखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीच्या आधारे पोलिसांनी शहरात व आसपासच्या परिसरात शोधमोहीम राबवून २ संशयितांना ताब्यात घेतले. (Jamkhed News)
करण अशोक पवार (वय २० वर्षे, रा. मिलिंदनगर, भुतवडा रोड, जामखेड) अनिल गौतम काळे (वय १९ वर्षे, रा. मिलिंदनगर, भुतवडा रोड, जामखेड) संशयितांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. (Jamkhed News)
आरोपी करण पवार याच्या घरातून ४,४७२ रुपयांचा चोरीचा किराणा माल तसेच दुकान फोडण्यासाठी वापरलेली लोखंडी कटावणी जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेले अन्य दोन आरोपी किरण उर्फ खंड्या रावसाहेब काळे आणि रोहीत अशोक काळे (दोघे रा. मिलिंदनगर, जामखेड) हे सध्या फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (Jamkhed News)
ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, आणि SDPO सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे, सपोनि शिवाजी कदम, पोहेकॉ/१०३ संजय लोखंडे, पोकॉ/ईश्वर माने, पोकॉ/गणेश ढोबळे, पोकॉ/दिपक बोराटे, पोकॉ/कुलदीप घोळवे, पोकॉ/ज्ञानेश्वर बेल्हेकर व मपोकॉ/रत्नमाला हराळे यांच्या पथकाने केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेकॉ संजय लोखंडे करत आहेत. (Jamkhed News)





