Jamkhed News : जामखेड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! फक्राबाद येथील १ लाख ९० हजारांच्या दरोड्याचा छडा; मुख्य आरोपीसह दोघे जेरबंद
Jamkhed News : कुटुंबावर तीक्ष्ण हत्यारांनी जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटणाऱ्या दरोडेखोरांचा जामखेड पोलिसांनी अत्यंत शिताफीने छडा लावला आहे.

Jamkhed News : फक्राबाद (ता. जामखेड) येथे ३१ मे रोजी रात्रीच्या सुमारास राहत्या घरासमोर झोपलेल्या कुटुंबावर तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला करत सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. (Jamkhed News)
याप्रकरणाचा अत्यंत शिताफीने छडा लावत जामखेड पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोन बालकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जूनला रात्री दीडच्या सुमारास फक्राबाद येथील फिर्यादी कौशल्या अण्णासाहेब आढाव (वय ४८) या आपल्या बहिणीसोबत घराबाहेर झोपल्या होत्या. (Jamkhed News)
यावेळी त्यांचे भाऊ अंगद आढाव यांना ३ ते ४ अनोळखी इसम कोयता, गज आणि काठीने मारहाण करत होते. फिर्यादी आणि त्यांच्या आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी त्यांचे तोंड बांधून त्यांनाही बेदम मारहाण केली. (Jamkhed News)
तसेच महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने (किंमत १,४०,०००/- रुपये), एक ओप्पो कंपनीचा मोबाईल (किंमत १०,०००/- रुपये) आणि कपाटातील रोख ४०,०००/- रुपये असा एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला होता. (Jamkhed News)
याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३१० (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. (Jamkhed News)
पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, हा गुन्हा कुणाल राजू भोसले (रा. राशिन, ता. कर्जत) याने त्याच्या इतर ४ ते ५ साथीदारांच्या मदतीने केला आहे. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पोलीस पथक तयार करण्यात आले. (Jamkhed News)
या पथकाने कर्जत तालुक्यातील राशिन गावात स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. पोलिसांनी मुख्य आरोपी कुणाल राजू भोसले याच्यासह दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. (Jamkhed News)
अधिक चौकशी केली असता, त्यांनी आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी कुणाल भोसले याला गुन्ह्यात रीतसर अटक केली आहे. (Jamkhed News)
ही धडक कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि विभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. (Jamkhed News)
या यशस्वी मोहिमेत जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पोसई किशोर गावडे, पो. ना. रविंद्र वाघ, योगेश दळवी, दिपक बोराटे, जिब्राईल शेख, गणेश ढोबळे तसेच कर्जत पोलीस ठाण्याचे दिपक कोल्हे आणि अर्जुन पोकळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी व तुकाराम सोनवणे करत आहेत. (Jamkhed News)





