जामखेड : कोरोनाचा उद्रेक सुरूच !

जामखेड : शहरात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच असुन आज 39 जणांची रॅपिड अँटीजीन टेस्टद्बारे तपासणी करण्यात आली. या मध्ये शहरातील अतीशय मध्यवर्ती भागात 3 रुग्ण आढळून आले असून यामध्ये एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास नगर येथील हॉस्पिटल मध्ये तातडीने पाठवण्यात आले आहे अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ युवराज खराडे यांनी दिली.’
शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यास तयार नाही गेल्या 8दिवसांपासून शहरासह तालुक्यात 50 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू देखील झाला आहे. आज सायंकाळपर्यंत जामखेड ग्रामीण रुग्णालयात रॅपिड अँटीजीन टेस्ट व्दारे तपासणी करण्यात आलेल्या 39 रुग्णांन पैकी 3 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
यामध्ये कोर्ट रोड, टेकाळे नगर व सदाफुले वस्ती अशा ठीकाणी हे 3 रुग्ण आढळून आले आहेत. ही तीनही ठिकाणे शहराच्या मध्यवर्ती भागात आसल्याने नागरीकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र नागरीकांनी घाबरून न जाता कामा शिवाय घराबाहेर पडु नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
प्रतिबंधित फक्त घरच
यापूर्वी कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने संपूर्ण परिसर पत्रे लावून कंटेनमेंट झोन करण्यात येत होता. मात्र प्रशासनाने नियमात बदल केल्याने आता बाधीत रुग्णाच्या घराजवळील परिसर सील करण्यात येतो. मात्र रुग्णाच्या संपर्कातील नागरिक आसपासच्या परिसरात फिरत असतात त्यामुळे परिसरात धोका वाढला आहे. त्यामुळे रुग्ण सापडलेला संपूर्ण परिसर सील करण्याची मागणी नागरिक करत आहेत.





