नवी दिल्ली – जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. मदनी म्हणाले की, भाजप आणि आरएसएससोबत कोणतेही धार्मिक शत्रुत्व नाही, केवळ गैरसमज वाढवणाऱ्या बाबींवरून मतभेद आहेत. दिल्लीतील रामलीला मैदानावर जमियत उलेमा-ए-हिंदचे तीन दिवसीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अध्यक्ष मौलाना महमूद मदनी म्हणाले, ‘आम्ही संघासमोर मैत्रीचा हात पुढे करतो. चला पुढे जाऊ आणि अलिंगन देऊन. सनातन धर्माच्या वाढीस आम्हाला कोणतीही अडचण नाही, परंतु इस्लामच्या वाढीसही कोणाला अडचण नसावी. या सभेला संबोधित करताना मौलाना महमूद मदनी म्हणाले की, ‘देशात राहणाऱ्या इतर वर्गाच्या लोकांच्या बोलण्याशी आपण मतभेद (भेदभाव) नक्कीच ठेवू शकतो, पण आम्ही त्यांच्या विरोधात नाही. आपल्या देशात अनेक भाषा आहेत, वेगवेगळी राहणीमान, विचारसरणी वेगवेगळी असूनही देश एकसंध आहे. आपण पाकिस्तानात गेलो असतो तर… अशी कल्पना करने सोडून दिले पाहिजे. ते म्हणाले, ज्यांचे मुघलांशी संबंध होते, ते १९४७ मध्ये निघून गेले. हा आपला देश आहे. आम्ही तुमच्या बोलावण्याने आलो नाही किंवा जा म्हणल्याने जाणार नाहीत. जमियतच्या अधिवेशनात 3 मोठे प्रस्ताव – जमियतच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पसमंदा मुस्लिम, मदरसे आणि समान नागरी संहितेबाबतचे प्रस्तावही मांडण्यात आले. यादरम्यान पसमंदा मुस्लिमांबाबत मंजूर झालेल्या ठरावात जमियतने म्हटले की, सरकार पसमंदा मुस्लिमांबाबत विचार करत आहे ही चांगली गोष्ट आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो, परंतु कलम 341 आता रद्द केले पाहिजे, जेणेकरून पसमांदा मुस्लिमांना आरक्षणाचा लाभ मिळू शकेल, जे धर्माच्या आधारावर काढले गेले आहे. याशिवाय मदरशांचे स्वातंत्र्य आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक ठरावही मंजूर करण्यात आला, ज्यामध्ये जमियतने म्हटले की, ‘मदरशांना लक्ष्य करणे थांबवले पाहिजे’. मदरशांमुळे मुस्लिमांच्या शिक्षणात वाढ होत असून स्वातंत्र्यापासून आजतागायत मदरशांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मदरशांमध्ये आधुनिक शिक्षण सतत आवश्यक केले जात आहे. जमीअतच्या मंचावरून असे सांगण्यात आले की मदरसे मुस्लिमांना जीवापेक्षाही प्रिय आहेत. धर्माच्या आधारावर मदरशांना लक्ष्य करता येणार नाही. त्याचवेळी, समान नागरी संहिता (यूसीसी) संदर्भात पास ठरावात सरकारवर आरोप करण्यात आला की, यूसीसीच्या माध्यमातून सरकार मुस्लिम पर्सनल लॉ रद्द करू इच्छित आहे, जे खपवून घेतले जाणार नाही. दरम्यान, जमियत उलेमा-ए-हिंदच्या परिषदेचे दोन दिवस पूर्ण झाले आहेत. आता उद्या या परिषदेच्या तिसर्या आणि शेवटच्या दिवशी या दोन दिवसांत मंजूर झालेल्या ठरावाचे हजारो लोकांसमोर वाचन करून देशातील मुस्लिमांना मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.