पिंपरी | राष्ट्रवादीच्या वतीने पवना धरण येथे जलपूजन

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण यावर्षी शंभर टक्के भरले आहे. याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज गुरुवारी (दि. १२) धरणातील पाणीसाठ्याची जलपूजा करण्यात आली.
आगामी विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे सत्ताधारी पक्षांना पवनाचा विसर पडल्याची टीका राष्ट्रवादीकडून करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांच्या हस्ते पवना धरण येथे जलपूजन करण्यात आले. यावेळी चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे, श्रीमंत जगताप, दिलीप पानसरे,
राजेंद्र कदम, एकलास सय्यद, हनुमंत वाबळे, नागेश सदावर्ते, गणेश काळे, सागर लष्करे, पप्पूलाल विश्वकर्मा, जिब्राईल शेख, हेमंत बलकवडे, श्रीकांत पवार, राजकुमार माने, प्रिया कांबळे, वंदना आराख, लक्ष्मीकांत गालफाडे आदी उपस्िथत होते.





