Crime News : महाराष्ट्र हादरला..! डोक्यात कुऱ्हाडीने वार करून सख्ख्या भावाकडून मोठ्या भावाची हत्या
Crime News : महाराष्ट्रात रक्ताच्या आणि कौटुंबिक नात्यांना काळिमा फासणाऱ्या दोन स्वतंत्र व सुन्न करणाऱ्या घटना समोर आल्या आहेत.

Crime News : महाराष्ट्रातील दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांत नात्यांना काळिमा फासणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. जालन्यात लहान भावाने मोठ्या भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना घडली, तर वाशिममध्ये विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून पित्याने विवाहित मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime News)
जालन्यात सख्ख्या भावाकडून मोठ्या भावाची हत्या
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथे सख्ख्या लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तुकाराम काकडे (वय २४) असे मृत तरुणाचे नाव असून, रामेश्वर काकडे (वय २२) असे आरोपी भावाचे नाव आहे. रात्री मोठा भाऊ झोपेत असताना त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याची माहिती आहे. (Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम विवाहित असून पत्नीसमवेत शेतातील घरात राहत होता. तर रामेश्वर आई-वडिलांसोबत गावातील घरी राहत होता. तुकारामच्या मद्यपानाच्या सवयीमुळे तसेच आई-वडिलांना मारहाण आणि लहान भावाचा अपमान करण्याच्या वर्तनामुळे घरात वारंवार वाद होत असल्याचे सांगण्यात येत आहे. (Crime News)
या त्रासाला कंटाळून रामेश्वरने रात्री झोपेत असलेल्या तुकारामवर कुऱ्हाडीने वार केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान रामेश्वरने हत्येची कबुली दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. (Crime News)
वाशिममध्ये पित्यावर विवाहित मुलीच्या हत्येचा आरोप
ज्या वडिलांनी मुलीला लहानाचे मोठे केले, तिच्या संसाराची स्वप्ने पाहिली, त्याच वडिलांनी तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ब्राह्मणवाडा येथे उघडकीस आला आहे. विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून संतप्त झालेल्या पित्याने ३५ वर्षीय विवाहित मुलीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. (Crime News)
पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष गोटे यांच्या मुलीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध असल्याच्या कारणावरून घरात वारंवार वाद होत होते. याच रागातून संतोष गोटे यांनी मुलीचा गळा आवळल्याचा आरोप आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि काटेपूर्णा नदीत अस्थींचे विसर्जनही करण्यात आले. (Crime News)
दरम्यान, पोलिसांना या घटनेबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संशयाच्या आधारे संतोष गोटे यांची चौकशी केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान त्यांनी हत्येची कबुली दिली. सध्या मृत महिलेच्या आईची तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने शिरपूर पोलीस पुढील तपास करत आहेत. (Crime News)





