Jalgaon News : जळगावमधील 6 मजुरांना कालव्यात फेकले; सुरतमधील धक्कादायक प्रकार
जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon News) सहा मजुरांना गुजरात राज्यातील एका कालव्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon News) सहा मजुरांना गुजरात राज्यातील एका कालव्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा भीषण प्रकार सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यात शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी घडला. या हृदयद्रावक घटनेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध सुरू आहे.
सुदैवाने, या घटनेतून एक मुलगा बचावला आहे.नितीन उर्फ भुरिया पाटील, पत्नी कविता पाटील अशी मृतांची नावे असून तिसरा मृतदेह त्यांच्या ९ वर्षांच्या मुलीचा आहे. याबाबत अधिक माहिती (Jalgaon News) अशी की, हे कुटुंब काही कामासाठी सुरतला जात होते. याप्रसंगी दुसऱ्या वाहनातून कुटुंबाचा पाठलाग करणाऱ्या चार जणांनी बारडोलीतील उवा गावाजवळ त्यांना अडवले.
यानंतर टोळीने आई-वडील आणि त्याच्या २ वर्षांच्या मुलाला एका वाहनात बसवले. तर अन्य दोघांना दुसऱ्या वाहनात बसवण्यात आले. यानंतर सर्वांना कालव्यात फेकून देण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या गंभीर घटनेच्या चौकशीला सुरुवात केली असून, चार संशयित जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मजुरांना कालव्यात का फेकण्यात आले, यामागे नेमके काय कारण आहे आणि कोणी हे कृत्य केले, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे (Jalgaon News) मजुरांच्या सुरक्षेचा आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.






