Jairam Ramesh : तिहेरी सरकारतर्फे मते, जागा, देणग्यांची चोरी; जयराम रमेश यांची केंद्र सरकारवर टीका
Jairam Ramesh : इंडिया आघाडीने भारताच्या सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरावृत्ती (एसआयआर) प्रक्रियेबाबत आणि आयोगाच्या पक्षपाती कामकाजाबाबत विशिष्ट चिंता व्यक्त केल्या आहेत.

Jairam Ramesh : इंडिया आघाडीने भारताच्या सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरावृत्ती (एसआयआर) प्रक्रियेबाबत आणि आयोगाच्या पक्षपाती कामकाजाबाबत विशिष्ट चिंता व्यक्त केल्या आहेत. तसेच, भारताच्या निवडणूक प्रणालीवरील लोकांचा विश्वास मोठ्या प्रमाणात डळमळीत झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
एकंदरीत ट्रिपल इंजिन सरकार मते, जागा, देणग्यांची चोरी करण्यात व्यग्र आहे, असा आरोप काॅंग्रेसचे सरचिटणीस खासदार जयराम रमेश यांनी केला आहे.एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना रमेश (Jairam Ramesh) यांनी म्हटले आहे की, आता अनेक लोकांचा असा विश्वास आहे की निवडणुकीचे निकाल आधीच निश्चित केलेले असतात.
सरन्यायाधिशांना लिहिलेल्या पत्रात एसआयआर प्रक्रिया आणि भारतीय निवडणूक आयोगाचे पक्षपाती कामकाज यांबाबतच्या विशिष्ट चिंता मांडल्या आहेत. आपल्या निवडणूक प्रणालीवर लोकांचा जो विश्वास होता तो मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचा मुद्दा मांडला आहे. लोकांचा असा विश्वास बसला आहे की निवडणुकीचे निकाल आधीच ठरवलेले असतात.
आपली राज्यघटना आणि आपली निवडणूक प्रणाली धोक्यात आहे यात काहीच शंका नाही. जर निवडणुकीचे निकाल आधीच निश्चित असतील, तर निवडणुका घेण्याचा काय अर्थ आहे? असेही रमेश (Jairam Ramesh) यांनी पुढे नमूद केले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे ढोंगी आहेत. निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या इशार्यावर काम करत आहे. असे दिसते की ज्ञानेश कुमार यांना खोटे बोलण्याचा आजार जडला आहे… पश्चिम बंगाल, बिहार, महाराष्ट्र आणि हरियाणा येथील त्यांच्या वागणुकीवरून असे दिसून येते की निवडणूक आयोग गृहमंत्री आणि पंतप्रधानांचे आदेश पाळते.
– जयराम रमेश, काॅंग्रेसचे सरचिटणीस






