जेलरफेम अभिनेत्याचा कारनामा! दारूच्या नशेत हॅाटेलमध्ये घातला राडा, व्हिडिओ व्हायरल होताच माफीनामा म्हणाला…

Malayalam actor Vinayakan : सुपरस्टार रजनींकात यांच्या जेलर चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता विनायकन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या अभिनेत्याने अनेक मल्याळम चित्रपटातही काम केलं आहे. मात्र, मद्यधुंद अवस्थेत केरळमधील एका हॅाटेलमध्ये गोंधल घालत हुल्लडबाजी करणाऱ्या विनायकनवर टीकेजी झोड उठवली जात आहे. सोशल मीडियावर विनायकनचा पोलिसांसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचे दिसत आहे.
विनायकन याने गुरुवारी ८ मे रोजी केरळमधील एका हॅाटेलमध्ये दारू पिऊन गोंधळ घातल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच वागणं व्हायरल व्हिडिओमध्ये कैद झालं आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, अंचलुम्मुदु पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अभिनेता विनायकन एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी २ मे पासून हॉटेलमध्ये थांबला होता. पण गुरुवारी तो दारू पिऊन चेकआउटवर गोंधळ घालू लागला.
എന്നെ ഇടിച്ചിട്ടവൻ ആരാണെന്ന് അറിയാതെ ഞാൻ സ്റ്റേഷനിൽ നിന്ന് ഇറങ്ങില്ല സാറേ… ഇടിയുണ്ടോ സാറേ’;
കൊല്ലത്ത് ഹോട്ടലിൽ പ്രശ്നമുണ്ടാക്കിയതിന് നടൻ വിനായകനെ കസ്റ്റഡിയിലെടുത്തു#Vinayakan pic.twitter.com/LXDXwzX38e
— Rajesh Sundaran (@editorrajesh) May 8, 2025
जेव्हा प्रकरण वाढलं तेव्हा पोलिसांना पाचारण करण्यात आले. यानंतर विनायकनला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. तपासणीनंतर त्याला अंचलुमुडू पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे केरळ पोलिस कायद्याच्या कलम ११८ (अ) (सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत आढळणे) अंतर्गत विनायकनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की विनायकन मद्यधुंद होता आणि तो सर्वांवर ओरडत होता. तो पोलिसांवरही ओरडला असल्याचे सांगितले.
विनायकन याआधीही अशा प्रकारच्या कारनाम्यामुळे अनेकदा अडचणीत आला आहे. सुमारे आठ महिन्यांपूर्वी विनायकनला हैदराबादमध्ये विमानतळ कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली होती. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तो दारू पिऊन विमानतळ कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करत होता. त्यानंतर शहर पोलिस कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०२३ मध्ये दारूच्या नशेत असलेल्या विनायकनने एका पोलिस अधिकाऱ्याला धमकावले आणि त्याच्याशी गैरवर्तन केले होते.
सोशल माीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला चित्रपटातून बंदी घालण्याची मागणी लोक करत आहेत. विनायकनने फेसबुक पोस्टमध्ये त्याच्या वागण्याबद्दल माफी मागितली आहे.




