जयदीप अहलावतला ‘रामायण’ चित्रपटाची होती ऑफर; पण ‘या’ कारणामुळे दिला नकार

Jaideep Ahlawat | अभिनेता जयदीप अहलावतने ‘पाताल लोक’, ‘राजी’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याला नितेश तिवारींच्या ‘रामायण’ या चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली होती. मात्र काही कारणांमुळे त्याला ही भूमिका नाकारावी लागली. यामागचे कारण देखील त्याने स्पष्ट केले आहे.
ईटाईम्स रिपोर्टनुसार, मेकर्सने जयदीप अहलावतला रावणाचा भाऊ बिभीषणच्या भूमिकेसाठी विचारलं होतं. ही आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी जयदीपही उत्सुक होता. मात्र तारखा न जुळल्याने आणि त्याचे आधीचे काही प्रोफेशनल कमिटमेंट्स असल्याने त्याला ही भूमिका नाकारावी लागली.
बिभीषणची वेगळी भावनिक बाजू जयदीपच उत्तमरित्या साकारु शकतो अशी मेकर्सला आशा होती. म्हणूनच जयदीपलाच पहिलं प्राधान्य होतं. मात्र त्याच्या तारखा शेवटपर्यंत जुळून आल्या नाहीत.
दरम्यान, नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटात विभीषणच्या भूमिकेसाठी जयदीप अहलावत यांच्यासह इतर अनेक अभिनेत्यांची नावे समोर येत आहेत. दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपतीयांच्याशी विभीषणच्या भूमिकेसाठी चर्चा सुरू होती, पण ती पूर्ण होऊ शकली नाही.
नितेश तिवारी यांच्या या चित्रपटात दमदार कलाकारांची फौज आहे. यात रणबीर कपूर भगवान रामाची, साई पल्लवी सीतेच्या आणि यश रावणाच्या भूमिकेत झळकणार आहे. तर सनी देओल, लारा दत्ता आणि कुणाल कपूर हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या चित्रपटाची निर्मिती नमित मल्होत्रा करत आहेत. ‘रामायण’ सिनेमा दोन भागात प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग २०२६ साली आणि दुसरा २०२७ साली रिलीज होणार आहे.
हेही वाचा :
आलियाची लेक बनली शेफ! सोशल मीडियावर फोटो अन् पोस्ट शेअर करत म्हणाली…





