आलियाची लेक बनली शेफ! सोशल मीडियावर फोटो अन् पोस्ट शेअर करत म्हणाली…

Alia Bhatt’s daughter | बॅालीवूड इंडस्ट्रीमधील क्यूट कपल म्हणून आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या जोडीकडे पाहिले जाते. या दोघांच्या लग्नाला नुकतीच ३ वर्ष पूर्ण झाली आहेत. सोशल मीडिया दोघांचाही चाहतावर्ग मोठा आहे. दोघेही आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी याद्वारे आपल्या चाहत्यांना नेहमी शेअर करत असतात. नुकतेच आलियाने तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तिची लेक राहा विषयी एक अनोखी गोष्ट सांगणारे आहेत.
आलियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये सुंदर सजलेला डायनिंग टेबल दिसत आहे. ज्यामध्ये खेळण्याच्या रंगीबेरंगी कणकीपासून जेवण बनवलेले दिसत आहे. आलिया-रणबीरच्या दोन वर्षांच्या मुलीने तिच्या कल्पनेनुसार जेवण बनवण्याचे दिसते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये “माझ्या आवडत्या शेफने प्रेमाने माझ्यासाठी ७ कोर्स असलेले जेवण बनवले आहे.” असे लिहिले आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोंवर अनेक कमेंट येत आहेत.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाला ३ वर्ष पूर्ण झाली आहे. या निमित्ताने आलियाने रणबीर कपूरबरोबरचा एक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याला हॅप्पी ३ असे कॅप्शन दिले आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आलियाच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आलिया भट्ट आणि रणबीर कपूर संजय लीला भन्साळी यांच्या लव्ह अॅन्ड वॅार चित्रपटात एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात विकी कौशलचीही विशेष भूमिका असणार आहे.





