अमरावती – आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांची शनिवारी त्या राज्यातील सत्तारूढ वायएसआर कॉंग्रेस पक्षाच्या आजीवन अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यामुळे जगन त्यांच्या हयातीत पक्षाध्यक्षपद भुषवू शकतील.
वायएसआर कॉंग्रेसच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी जगन यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. जगन यांना आजीवन अध्यक्षपदी राहता यावे यासाठी पक्षाच्या घटनेत बदल करण्यात आला. आता त्या बदलाला मान्यता देण्याचे साकडे वायएसआर कॉंग्रेसकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला घातले जाईल.
काही प्रादेशिक पक्षांनी तशाप्रकारची मान्यता मिळवली असल्याकडे वायएसआर कॉंग्रेसने लक्ष वेधले आहे. इतर कुणी पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू नये यासाठी ते पाऊल उचलण्यात आल्याचे समजते.
अमेरिकेचा तालिबानला चर्चेस नकार, मागणीही धुडकावली…
जगन यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर मार्च 2011 मध्ये वायएसआर कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून जगन हेच त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. स्थापनेपासूनच तो पक्ष आंध्रच्या राजकारणात प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरला. आता तर तो पक्ष त्या राज्याच्या सत्तेवर आहे.
कार्ती चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ, आणखी एका मालमत्तेची झडती