जॅकलीन फर्नांडिसचा लीलावती रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल

Jacqueline Fernandez | अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने अनेक चित्रपटांमध्ये दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. चित्रपटांसह ती तिच्या वैयक्तिक कारणामुळे देखील चर्चेत राहिली आहे. यातच आता जॅकलीनबाबत एक वेगळी माहिती समोर आली आहे. जॅकलिनची आई किम यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी जॅकलिन आईला भेटण्यासाठी लीलावती रुग्णालयात पोहोचली होती.
रुग्णालयाबाहेरील जॅकलिनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बुधवारी आईला भेटण्यासाठी ती रुग्णालयात पोहचताच तिला पापराझींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. यावेळी जॅकलिन पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. तिनं काळ्या मास्कने चेहरा झाकला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, जॅकलिनची आई आयसीयूमध्ये आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. Jacqueline Fernandez |
View this post on Instagram
जॅकलिनच्या कामबद्दल बोलायचं झालं तर, तिने 2009 मध्ये रितेश देशमुखसोबत ‘अलादीन’ चित्रपटात काम केले होते. याशिवाय तिने हाउसफुल 2, मर्डर 2, किक, ब्रदर्स आणि जुडवा 2 सारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. लवकरच ती’वेलकम टू द जंगल’ मध्ये दिसणार आहे. Jacqueline Fernandez |
हेही वाचा:
‘सिकंदर’ चित्रपटादरम्यान सलमानच्या चाहत्यांंनी थिएटरमध्येच फोडले फटाके




