‘सिकंदर’ चित्रपटादरम्यान सलमानच्या चाहत्यांंनी थिएटरमध्येच फोडले फटाके

Salman Khan | बॉलीवूडचा दबंग सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. देशभरात सलमानचा मोठा चाहता वर्ग आहे. यातच आता त्याच्या चाहत्यांनी स्क्रीनिंग दरम्यान कहर केला आहे. सलमानच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये फटाके फोडले त्यामुळे प्रेक्षकांना थिएटरमधून पळावं लागलं. सोशल मीडियावत हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यापूर्वी देखील चाहत्यांकडून असा प्रकार घडले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एका थिएटरमध्ये ‘सिकंदर’ चित्रपटामध्ये सलमानच्या एंट्रीच्या वेळी चाहत्यांनी फटाके फोडल्याने थिएटरमध्ये मोठी खळबळ माजली. या घटनेमुळे प्रेक्षकांना घाबरून बाहेर पडावे लागले. व्हायरल या व्हिडिओमध्ये काही प्रेक्षक फटाके फोडताना दिसत आहे, ज्यानंतर काहीजण भीतीने धावताना दिसत आहेत.
या आधीही टायगर 3 सिनेमाच्या प्रदर्शनावेळी काहींनी थिएटरमध्ये फटाके फोडले होते. त्यामुळे सलमानने सोशल मीडियावर ट्विट करत असं न करण्याची विनंती चाहत्यांना केली होती. “Tiger 3 दरम्यान थिएटरमध्ये आतषबाजी करण्यात आल्याचे ऐकिवात आले. हे धोकादायक आहे. स्वतःचे आणि इतरांचे जीवन धोक्यात न घालता चित्रपटाचा आनंद घेऊया. सुरक्षित राहा,” असं ट्विट त्यांनी केलं होतं. Salman Khan |
Malegaon Fan Club 🔥💥 #Sikandar pic.twitter.com/Qv42bgJ0Dx
— Radhe Bhai Editx (@Radhe_Bhai_027) March 31, 2025
‘सिकंदर’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 26 कोटींची कमाई तर दुसऱ्या दिवशी 29 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाने तिसऱ्या दिवशी फक्त 19.5 कोटींची कमाई असून चौथ्या दिवशीच्या आकड्यात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. ‘सिकंदर’ चित्रपटाने चौथ्या दिवशी 9.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चार दिवसात हा चित्रपट 84.25 कोटींवर पोहोचला आहे. आता चित्रपटाची 100 कोटींच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. Salman Khan |
या चित्रपटात सलमान खानसोबत साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना झळकली आहे. तसेच चित्रपटात काजल अग्रवाल, शरमन जोशी, प्रतिक बब्बर आणि सत्यराज हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. Salman Khan |
हेही वाचा:





