Jacqueline Fernandez | बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची आई किम फर्नांडिस यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी जॅकलिनच्या आईला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. जॅकलिनच्या आईचं निधन झाल्याने अभिनेत्रीवर शोककळा पसरली आहे. बॉलिवूड कलाकारांनी आणि चाहत्यांनी जॅकलिनच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे. जॅकलिनची आई किम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर अभिनेत्री अनेकदा आईला भेटण्यासाठी लीलावती रुग्णालयाबाहेर स्पॉट झालेली दिसली. जॅकलिनच्या आईवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. जॅकलिनच्या आईची तब्येत बिघडल्याचं समजताच अभिनेता सलमान खानसुद्धा त्यांची विचारपूस करण्यासाठी पोहोचला होता. Jacqueline Fernandez | 2022 मध्येही किम यांना स्ट्रोक आला होता आणि त्यावेळी बहरीन येथल्या रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. जॅकलिनच्या आयुष्यात आईचं छत्र हरपल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, जॅकलिनचे बॉलिवूडचे मित्र-मैत्रीण आणि इतर कलाकार अभिनेत्रीच्या आईचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आणि तिला धीर देण्यासाठी लीलावती रुग्णालयात भेट देत आहेत. Jacqueline Fernandez | हेही वाचा: पंतसचिव राजवाड्यात रामनामाचा जयघोष..; फुलांची उधळण करत रामजन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा