जॅकलीनला सुकेश चंद्रशेखरची दोस्ती पडली महागात; नागार्जुनच्या चित्रपटातून केलं बाहेर

मुंबई – २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर आणि बॉलिवूड अभिनेत्री ‘जॅकलीन फर्नांडिस’ यांचे नाते सध्या जोरदार चर्चेत आहे. अलीकडेच जॅकलीनचा सुकेशसोबतचा लव्हबाईटचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
त्यानंतर आता पुन्हा एकदा जॅकलीन चर्चेत आली आहे. वास्तविक, अभिनेत्रीला आता एका बिग बजेट चित्रपटातून काढण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहिती नुसार अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आता प्रसिद्ध अभिनेता नागार्जुन अक्किनेनीच्या “द घोस्ट’ चित्रपटाचा भाग असणार नाही. आता हे कितपत सत्य आहे… हे अद्याप कोणीही सांगू शकत नाही.
मात्र, लोकांचा असा विश्वास आहे की मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नाव आल्यानंतर निर्मात्यांनी जॅकलीनपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, ‘द घोस्ट’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. ‘द घोस्ट’ चित्रपटात जॅकलिन आधी अभिनेत्री काजल अग्रवालला कास्ट करण्यात आले होते, परंतु तिच्या प्रेग्नेंसीमुळे तिने हा चित्रपट सोडला. आणि त्यानंतर जॅकलिनच्या नावावर शिक्का मोर्तब झाला.





