पाकमध्ये स्फोटानंतर जाफर एक्सप्रेसचे ४ डबे रुळावरून घसरले ; ३ महिन्यांपूर्वी याच ट्रेनचे बलुचांनी केले होते अपहरण

Jacobabad Railway Explosion। पाकिस्तानमधील जेकबाबादजवळील रेल्वे ट्रॅकवर मोठा स्फोट झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटामुळे जाफर एक्सप्रेसचे ४ डबे रुळावरून घसरले. ही ट्रेन पेशावरहून क्वेट्टाला जात होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटामुळे रेल्वे ट्रॅकवर तीन फूट रुंद खड्डा निर्माण पडला तर सुमारे सहा फूट लांबीचे ट्रॅक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.मात्र, या अपघातात कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही ही दिलासादायक बाब आहे. रेल्वे आणि सुरक्षा एजन्सी घटनास्थळी तपास करत आहेत.
एका वृत्तवाहिनीवर, स्फोट इतका शक्तिशाली होता की डब्यांचे चाक रुळावरून घसरले आणि ट्रेन अचानक थांबली. समोर आलेल्या माहितीनुसार या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच कोणत्याही मृत्यूची पुष्टी झालेली नाही. मदत आणि बचाव पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली आहेत आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले जात आहे.
An explosion occurred on the railway track near Jacobabad, Balochistan province causing four coaches of the Jaffar Express to derail. The train was en route from Peshawar to Quetta. According to police, the blast left a 3-foot-wide crater on the track, and around 6 feet of the… pic.twitter.com/ltXbrEUwdt
— Abdullah Jan Sabir (@AbdullahJanSab1) June 18, 2025
या मार्गाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित Jacobabad Railway Explosion।
जेकबाबादजवळ जाफर एक्सप्रेसमध्ये झालेल्या स्फोटामुळे पुन्हा एकदा या मार्गाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या ट्रेनवर यापूर्वीही अनेकदा हल्ले झाले आहेत. बलुचिस्तानला रेल्वे प्रवासासाठी असुरक्षित मानले जाते. या प्रदेशाला बऱ्याच काळापासून फुटीरतावाद, हिंसाचार आणि लष्कराविरुद्धच्या बंडाचा सामना करावा लागत आहे.
मार्च २०२५ मध्ये जाफर एक्सप्रेसचे अपहरण Jacobabad Railway Explosion।
या वर्षी मार्चमध्ये, बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने जाफर एक्सप्रेसचे अपहरण केले होते. त्यावेळी ट्रेनमध्ये सुमारे ३५० प्रवासी होते. पाकिस्तानी सैन्याने मोठ्या कष्टाने ऑपरेशन केले आणि ट्रेन मुक्त केली, परंतु बीएलएने दावा केला की त्यांनी १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना मारले. तथापि, पाकिस्तानी लष्कराने ३५ ओलिसांचा मृत्यू झाल्याची कबुली दिली होती.





