रजनीकांतच्या ‘जेलर’मध्ये झळकणार जॅकी श्रॉफ; अभिनेत्याचा फर्स्ट लूक आउट

मुंबई – सुपरस्टार रजनीकांतचा ‘कोलामावू कोकिला’ आणि ‘डॉक्टर’ फेम नेल्सन दिलीप कुमार यांच्या आगामी ‘जेलर’ चित्रपटाचा टीझर काही महिन्यांपूर्वीच रिलीज झाला करण्यात आला आहे. थलैवाच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. ‘जेलर’चा टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चाहत्यांनी त्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला.
रजनीकांत या चित्रपटात ‘जेलर मुथुवेल पांडियन’ची भूमिका साकारताना दिसणार आहेत, ज्यामध्ये प्रियंका मोहन, शिवा राजकुमार, रम्या कृष्णन, योगी बाबू, वसंत रवी, विनायकन असे अनेक प्रसिद्ध चेहरे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. याला 2023 मधील सर्वात मोठा चित्रपट म्हटले जात आहे. आता जेलर चित्रपटाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे.
बॉलीवूड अभिनेता ‘जॅकी श्रॉफ’ देखील या चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये सामील झाला असून अभिनेत्याचा फर्स्ट लूक देखील समोर आला आहे, ज्यामध्ये तो खतरनाक स्टाईलमध्ये दिसत आहे. सन पिक्चर्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून जॅकी श्रॉफचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्याचा हा लूक खूप पसंत केला जात आहे.





