Vidya Balan And Jackie Shroff | अभिनेत्री विद्या बालन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक व्हिडिओ आणि फोटो ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकतेच विद्या बालनला अभिनेता जॅकी श्रॉफने एक खास गिफ्ट दिले आहे. ज्याचा व्हिडिओ तिने इनस्टाग्रामवर शेअर करत जॅकी श्रॉफचे आभार मानले आहेत. जॅकी श्रॉफने अभिनेत्रीला पर्यावरण पूरक हार गिफ्ट केला आहे. विद्या बालनने इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये तिने गळ्यात लॉकेट म्हणून छोटं झाडाचं रोपटं घातले आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री लॉकेटबद्दल सांगत आहे. अनेकदा जॅकी श्रॉफ हे कॅमेऱ्यासमोर झाडाचं छोटं रोपटं घेऊन स्पॉट झाले आहेत. Vidya Balan And Jackie Shroff | व्हिडिओमध्ये ती म्हणते की, “माझ्या गळ्यात असलेलं झाडाचं रोपटं गिफ्ट म्हणून जॅकी श्रॉफ म्हणजेच भिडूने दिलं आहे. मला त्यांनी दिलेलं गिफ्ट प्रचंड आवडलं आहे. या झाडातून मला ऑक्सिजन मिळते. यामुळे मी एक चांगला आणि दीर्घ श्वास घेऊ शकत आहे. भिडूने दिलेले गिफ्ट मला प्रचंड आवडले असून गिफ्ट म्हणून ही संकल्पना खूप चांगली आहे. मला त्यांनी दिलेलं गिफ्ट आवडले.” Vidya Balan And Jackie Shroff | सध्या विद्या बालन सध्या सोशल मीडियावरील रिल्समुळे चर्चेत असते. ती शेवटची ‘दो और दो प्यार’ चित्रपटामध्ये दिसली होती. तिच्यासोबत चित्रपटामध्ये प्रतीक गांधी, इलियाना डिक्रुझ आणि सेंथिल राममूर्ती हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. हेही वाचा: बिहारच्या जेहानाबादच्या सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी ; 8 जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी