बॅाक्स अॅाफिसवर ‘जारण’चा बोलबाला! आठवड्याभरात तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई

Jaran Marathi Movie Box Office Connection : जून महिन्याच्या सुरूवातीला रिलीज झालेल्या ‘जारण’ या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांवर मोहिनी टाकली आहे. चित्रपटाला रिलीज होऊनव आठवडा झाला असून, चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर तगडी कमाई केली आहे. यासोबतच प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप मिळवली आहे. या चित्रपटाचे प्रेक्षकांनी कौतुक केलेच, याशिवाय चित्रपटाने अनेक दिग्गज कलाकारांह समीक्षकांचे लक्ष वेधले आहे.
‘जारण’ या शब्दाचा अर्थ करणी असा केला जातो. या चित्रपटाची कथा या विषयाला घेऊन तयार करण्यात आले आहे. याशिवाय चित्रपट अंधश्रद्धेवरही भाष्य करतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक जारण पाहिल्यानंतरचा अनुभव शेअर करत आहेत. याशिवाय चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्री अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या भूमिकेंची कौतुक प्रेक्षक करत आहेत. बॅालीवूड चित्रपटांच्या भाऊगर्दीत जारण हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटर्सकडे खेचून आणण्यात यशस्वी झाला आहे.
acnilkच्या रिपोर्टनुसार, जारण चित्रपटाने पहिल्या दिवशी १२ लाखांची कमाई केली होती. यानंतर चित्रपटाच्या कमाईत वाढ होत गेली. या चित्रपटाने आठवड्याभरात तब्बल २.३ कोटींचे बॅाक्स अॅाफिस कलेक्शन केले आहे.. ‘जारण’मध्ये मानवी भावभावना, सामाजिक गुंतागुंत आणि संघर्षाचे वास्तव हृदयस्पर्शी पद्धतीने उलगडले गेले आहे. चित्रपटातील कथा त्याची केलेली मांडणी सीन्स गाणी असे सगळचं गुंतवूण ठेवणारे आहे.





