It’s Official : अभिनेत्री ईशा देओलचा एक्स पती भरत तख्तानी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. १२ वर्षांच्या संसारानंतर त्यांचा घटस्फोट झालेला. घटस्फोटानंतर भरतने आपल्या नवीन नात्याची कबुली सार्वजनिकरित्या दिली आहे. भरत तख्तानीने आपल्या गर्लफ्रेंड मेघना लाखानीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत “It’s Official” अशी घोषणा केली आहे. भरतने इन्स्टाग्राम स्टोरीवर मेघनाबरोबरचा एक फोटो पोस्ट केला असून “माझ्या कुटुंबात स्वागत” असं कॅप्शन देत रेड हार्ट इमोजी वापरला आहे. त्याचबरोबर It’s Official असा हॅशटॅग टाकून आपल्या प्रेमसंबंधांची अधिकृत घोषणा केली आहे. मेघनाचीही नवी सुरुवात भरतच्या या पोस्टनंतर मेघना लाखानीनेदेखील तोच फोटो रिपोस्ट करत एक नवीन फोटो शेअर केला. त्यावर तिने “प्रवास सुरू झालाय” असं लिहिलं आहे. या दोघांनीही आपले फोटो स्पेनच्या माद्रिद शहरातून शेअर केले आहेत. कोण आहे मेघना लाखानी? मेघना लाखानी ही एक तरुण उद्योजक असून तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये तिने Entrepreneur अशी ओळख दिली आहे. मेघना आतापर्यंत तब्बल ७७ देशांना भेट देऊन आली आहे. लाइफस्टाइल आणि इव्हेंट मॅनेजमेंटशी संबंधित काम ती करते. तिच्या इन्स्टाग्रामवर ८० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ईशा-भरतचं लग्न आणि घटस्फोट ईशा देओल आणि भरत तख्तानीचं लग्न २०१२ मध्ये झालं होतं. या दांपत्याला राध्या आणि मिराया या दोन मुली आहेत. मात्र, १२ वर्षांच्या सहजीवनानंतर दोघांनी २०२४ मध्ये सहमतीने घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या निवेदनात त्यांनी मुलींचं संगोपन एकत्रितपणे करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. धर्मेंद्र आणि ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची मुलगी असलेल्या ईशा देओलच्या घटस्फोटानंतर आता भरत तख्तानीचं नाव मेघना लाखानीसोबत जोडलं जात असून, या दोघांच्या पोस्ट्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.