Parvati Shinde : “जावई सुटला नाही तरी चालेल, पण….”; भोंदू खरातच्या सासूबाईंची प्रतिक्रिया समोर म्हणाल्या “आमच्या खानदानात…”
Parvati Shinde : बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात आता त्याच्या सासूबाई पार्वती शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Parvati Shinde : नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. एसआयटीकडून खरातची कसून चौकशी सुरू असताना त्याची पत्नी कल्पना खरात गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे.
या प्रकरणात पहिल्यांदाच खरातच्या सासूबाई पार्वती शिंदे समोर आल्या असून त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना भावनिक प्रतिक्रिया दिली. “जावई सुटला नाही तरी चालेल, पण माझी मुलगी सुखरूप परत यावी,” अशी आर्त विनंती त्यांनी केली.
त्या पुढे म्हणाल्या, “आमच्या खानदानात असं कधीच घडलं नाही. माझी मुलगी खूप साधी आणि भोळी आहे. तिने कुणाला कधी काही बोललं नाही. तिच्या नशिबी हे का आलं, हे कळत नाही. ती फक्त घरी परत यावी, एवढीच इच्छा आहे.”
दरम्यान, पोलिसांनी कल्पना खरातचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तैनात केली असून तिच्या मैत्रिणी आणि नोकरांचीही चौकशी करण्यात येत आहे. तरीदेखील अद्याप ती पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
अंजली दमानिया काय बोलणार? ( Parvati Shinde)

Ashok Kharat Case
याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया उद्या पत्रकार परिषद घेणार असून या प्रकरणातील महत्त्वाचे तपशील उघड करण्याची शक्यता आहे. त्यांनी खरातला कॉल करणाऱ्यांची यादी जाहीर करण्याचा इशारा दिला असून त्यात राजकारणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे असू शकतात, असा दावा केला जात आहे.
खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर करणार
सध्या अशोक खरातविरोधात एकूण 15 गुन्हे दाखल झाले असून सोमवारी त्याला न्यायालयाने सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एसआयटीने आणखी एका गुन्ह्याच्या तपासासाठी त्याच्या कोठडीची मागणी केली असून त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. Parvati Shinde
हेही वाचा : Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात! एकाचा आगीत होरपळून दुर्देवी अंत; दोघे बजावले





