“ह्याला चिंधी विचार म्हणतात साहेब” निलेश राणेंची जळजळीत टीका
Updated On:

अमरावती – देशातील शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असताना त्यांच्या वाटेत खिळे ठोकले जातात. यापूर्वी शेतकऱ्यांना कधीही अशाप्रकारची वागणूक मिळाली नव्हती. आता या देशात मोगलाई आली आहे का, असा संतप्त सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या सवालावरुन निलेश राणेंनी ट्विट करत टीकास्त्र सोडलं आहे.
निलेश राणे म्हणाले,’अजित पवारांना महाराष्ट्र सरकार म्हणायचं होत चुकून देशात म्हणाले… हेराफेरी करून पद मिळाल्यावर असं होतं. परवा भाषणात कुठेतरी ‘मी अनेक वेळा आमदार झालो पण जॅकेट घातलं नाही’ म्हणाले, ह्याला चिंन्दी विचार म्हणतात साहेब तुम्ही उपमुख्यमंत्री आहात महाराष्ट्राच्या हिताचे काहीतरी बोला.’ अस म्हणत त्यांनी ट्विट करत सडेतोड उत्तर दिले आहे.






