सहा मिनिटांच्या फाईट शूटसाठी लागले 11 दिवस !अजय देवगणच्या BHOLA चा तो Video Viral

मुंबई – अजय देवगणचा भोला हा चित्रपट ३० मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजयने स्वतः केले आहे. भोला हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. भोला हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये अजयची जबरदस्त अॅक्शन फॅन्सला पाहायला मिळणार आहे. नुकतंच अजयने चित्रपटातील एका ऍक्शन सीनबाबतची माहिती समोर आणली. हा एक कार आणि ट्रक यांच्यातील चेस सीक्वेन्स आहे.
चित्रपटातील महत्वाच्या अॅक्शनच्या मेकिंगचा व्हिडीओ अजय देवगणने सोशल मीडियावर शेअर केला आहे.या सीनच्या शूटिंगमागील तयारीची झलक दाखवली आहे. या सीक्वेन्सच्या तयारीलाच तीन महिने लागले, असे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. भरपूर प्लॅन्स केले आणि रिहर्सल झाल्या. व्हिडिओमध्ये या रिहर्सलची दृश्ये देखील आहेत, ज्यामध्ये स्टंटमन बाइक हवेत फेकताना दिसत आहे.
अजय या दृश्यांवर अॅक्शन कोरिओग्राफरसोबत चर्चा करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दावा करण्यात आला आहे की, अशा प्रकारची अॅक्शन याआधी कोणत्याही चित्रपटात दाखवण्यात आलेली नाही. अजयने या चित्रपटाची अॅक्शन त्याच्या वडिलांना समर्पित केली आहे. व्हिडिओमध्ये लिहिले आहे या चित्रपटाची अॅक्शन माझे वडील वीरू देवगण यांना समर्पित आहे, ज्यांनी मला सर्व काही शिकवले.
View this post on Instagram
व्हिडिओसह, अजयने खुलासा केला की सहा मिनिटांचा ट्रक-बाईक चेस सीक्वेन्स शूट करण्यासाठी 11 दिवस लागले. भोला 3D सोबत IMAX मध्ये देखील प्रदर्शित होत आहे.अजय देवगणच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चौथा चित्रपट आहे. यापूर्वी त्याने गेल्या वर्षी रनवे 34 आणि 2016 मध्ये शिवाय दिग्दर्शित केले होते. 2008 मध्ये आलेला यू मी और हम हा अजयचा दिग्दर्शकीय पदार्पण होता. चित्रपटात तब्बू आणि अमला पॉल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.





