ऐकावं ते नवलंच! नवऱ्याने दिला घटस्फोट; बायकोने फोटोशूट करत साजरा केला आनंद

नवी दिल्ली : आजपर्यंत तुम्ही आम्ही लग्नाच्या आधी प्री वेडिंग शूट आणि लग्नातील विविध पद्धतीचे शूट पाहिले आहे. मात्र कोणी घटस्फोट झाल्यानंतर तो आनंद व्यक्त करण्यासाठी त्याचे फोटोशूट केल्याचे तुम्ही ऐकलं आहे का ? होय अशी एक घटना समोर आली असून त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या सोशल मीडियावर या घटस्फोटाच्या फोटोशूटचे फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून आपल्यालाही धक्का बसेल. कारण नवऱ्याच्या जाचाला कंटाळून घटस्फोट घेत मोकळा श्वास घेणाऱ्या महिला आनंद म्हणून हे फोटोशूट करत असतात.
View this post on Instagram
या फोटोशूटमध्ये या महिलेने आपल्या लग्नातील फोटोसुद्धा फाडले आहेत. दरम्यान, फोटो पायाखाली ठेवून त्याचा तिरस्कार करताना एका फोटोमध्ये दिसत आहे.
तर “I Got 99 Problems but husband ain’t one” असा बोर्ड घेऊनही या महिलेने फोटो काढले आहेत. त्यासोबतच तिने ‘घटस्फोट म्हणजे अपयश’ नाही असे म्हणत एक संदेश देखील दिला आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. तर यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.





