ISSF World Cup 2024 : वर्ल्डकप नेमबाजीत भारताच्या ‘सिफ्ट कौर सामरा’ला कांस्यपदक…

ISSF World Cup 2024 : भारतीय नेमबाज सिफ्ट कौर सामरा हिने शुक्रवारी म्युनिक, जर्मनी येथे आयएसएसएफ (ISSF) विश्वचषक 2024 मध्ये महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेत 469.3 च्या जागतिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकणाऱ्या सिफ्ट कौर सामराने म्युनिक येथे झालेल्या अंतिम सामन्यात 452.9 गुण मिळवून पोडियमवर तिसरे स्थान पटकावले. ग्रेट ब्रिटनच्या सियोनैड मॅकिंटॉशने 466.7 गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या जियायू हानने 462.6 गुणांसह रौप्यपदक पटकावले.
सिफ्ट नीलिंग पोजीशननंतर सातव्या आणि प्रोन पोजीशननंतर पाचव्या स्थानावर होती. त्यानंतर तिने स्टॅडिंग पोजीशनमध्ये चांगली कामगिरी केली ज्यामुळे ती कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरली. दरम्यान, 22 वर्षीय भारतीय नेमबाज सिफ्ट कौर सामरा ही महिलांच्या 50 मीटर रायफल पोझिशन 3 पात्रता फेरीत 593 गुणांसह पाचव्या स्थानावर राहून अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती.
ISSF World Cup 2024 : वर्ल्डकप नेमबाजीत भारताच्या ‘सरबजोत सिंग’चा सुवर्णवेध….
भारताला पदकतालिकेत तिसऱ्या स्थानावर…
सिफ्ट कौर सामरा हिचे कांस्यपदक हे सध्या सुरू असलेल्या आयएसएसएफ (ISSF) विश्वचषकातील भारताचे दुसरे पदक होते. याआधी सरबज्योत सिंगने गुरुवारी पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. एक सुवर्ण आणि एक कांस्य पदकांसह भारताने पदकतालिकेत फ्रान्ससह तिसरे स्थान पटकावले.
India finish their campaign at Shooting World Cup in Munich with 1 Gold & 1 Bronze:
Gold: Sarabjot Singh (10m Air Pistol)
Bronze: Sift Kaur Samra (50m Rifle 3P)Next: World Cup (Shotgun) in Lonato, Italy starting from 12th June
📸 @Media_SAI pic.twitter.com/ixandwnNg9
— India_AllSports (@India_AllSports) June 7, 2024
अशा प्रकारे भारताने दोन पदके जिंकून या स्पर्धेतील आपली मोहीम संपवली. चीन 11 पदकांसह (चार सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्य) अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर नॉर्वेने (एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदक) दुसरे स्थान मिळवले आहे.





