इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांचा आणखी एक दमदार कामगिरी; वयाच्या ६१ व्या वर्षी पूर्ण केली PhD

S .Somnath IIT-Madras PhD | चांद्रयान-३ च्या यशाचे जनक इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथने वैयक्तिक आयुष्यात मोठा विक्रम केला आहे. त्यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले आहे. शुक्रवारी दीक्षांत समारंभात आयआयटी मद्रासने त्यांना ही पदवी प्रदान केली.
इस्रोच्या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली भारताचे चांद्रयान-३ गेल्या वर्षी चंद्रावर यशस्वीपणे उतरले होते. एस. डॉक्टरेटची पदवी मिळाल्यानंतर सोमनाथ यांनी आनंद व्यक्त केला आहे. संशोधनाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एस. सोमनाथ यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्यासाठी ही एक वेगळी भावना आहे.
डॉक्टरेट पदवी प्राप्त केल्यानंतर डॉ.सोमनाथ यांनी म्हंटले की, “आयआयटी-मद्राससारख्या प्रतिष्ठित संस्थेतून पदवी मिळवणे एक खेड्यातील मुलगा म्हणून मोठा सन्मान आहे. मी जरी टॉपर असलो तरी, माझ्यात आयआयटी प्रवेश परीक्षा देण्याची हिंमत नव्हती, पण एक दिवस मी येथून पदवीधर होईन असे माझे स्वप्न होते. मी प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू येथून माझी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे आणि आता आयआयटी-मद्रासमधून पीएचडी केली आहे.”
आयआयटी-मद्रास दीक्षांत समारंभात सुमारे 2,636 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये केवळ बी.टेक पदवी प्राप्त केलेल्या पदवीधरांचा समावेश आहे. दीक्षांत समारंभाला नोबेल पारितोषिक विजेते प्रोफेसर बिरनचे कोबिल्का हे प्रमुख पाहुणे होते. तर डॉ.सोमनाथ यांनी पुन्हा एकदा केलेल्या त्यांच्या दमदार कामगिरीचे देखील अनेकांकडून कौतुक केले जात आहे.
हेही वाचा:





