जेरुसलेम – इस्रायलमध्ये राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी पुन्हा एकदा निवडणुका होत आहेत. गेल्या चार वर्षांच्या कालावधीमध्ये इस्रायलमध्ये पाचव्यांदा निवडणुका होत आहेत. आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली आणि या निवडणुकीचा निकाल उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर देशात सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया आणखीन काही आठवडे सुरू राहण्याची शक्यता आहे. या मुदतपूर्व निवडणुकांमुळे माजी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू हे पुन्हा एकदा सत्ता संपादन करण्याच्या प्रयत्नात असल्याचे मानले जाते आहे. मात्र त्यांच्या प्रतिस्पर्धी गटांनी आघाडी कायम ठेवल्यास त्यांना हे लक्ष्य गाठणे अवघड होणार आहे. या अटितटीच्या लढतीनंतरही राजकीय कोंडी कायम राहू शकते, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. नेत्यान्याहू यांनी आघाडी सरकारने नेतृत्व करायचे हे मान्य केले तरच ही राजकीय कोंडी सुटू शकते. मात्र नेत्यान्याहू यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आघाडीसाठी अन्य पक्ष त्यांच्याबरोबर येण्याची शक्यता कमी आहे. Gujarat Assembly Elections 2022 : गुजरातमध्ये ओवेसींमुळे कॉंग्रेसचे नुकसान नेत्यान्याहू यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या यार लिपिड यांच्या प्रभावाखाली नेत्यान्याहू यांचे सर्व विरोधक एकत्र आले तर चित्र वेगळे दिसू शकते.