इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर बॉम्बहल्ला; संरक्षण मंत्र्यांनी दिला इशारा

Netanyahu Home Attack | पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या यांच्या सीझेरिया येथील निवासस्थानावर पुन्हा हल्ला झाला आहे. नेतन्याहू यांच्या निवासस्थानाच्या दिशेने दोन फ्लेयर बॉम्ब टाकण्यात आले. परंतु हा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य घरी उपस्थित नव्हते, असे एका निवेदनात म्हटले आहे.
तसेच अद्याप नुकसानीची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिस सध्या तपास करत आहे. इस्राइलचे राष्ट्रपती इसहाक हर्जोग यांनी एक्सवरून या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले.
इस्राइलचे संरक्षणमंत्री इतामार बेन-गविर यांनीही या हल्ल्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया देत सांगितले की, बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरोधातील कारवायांनी सर्व हद्द पार केली आहे. त्यामुळे आम्ही आता आवश्यक ते सर्व पावले उचलू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
Israel | Two flash bombs were fired towards Israeli PM Benjamin Netanyahu’s home in the northern Israeli town of Caesarea on Saturday and fell into the garden. Neither Netanyahu nor his family were present and there was no damage reported, reported Reuters quoting police.
— ANI (@ANI) November 17, 2024
याप्रकरणी सुरक्षा आणि न्यायिक संस्थांना आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. मात्र या घटनेची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही.
नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्याची दुसरी वेळ
मागच्या काही महिन्यांत बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी ऑक्टोबरमध्ये लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने नेतन्याहू यांच्या घराला ड्रोन हल्ल्यात लक्ष्य केले होते. लेबनॉनमधून पाठवलेले ड्रोन बेंजामिन नेतन्याहू यांच्या सीझेरिया येथील घराजवळ पडले होते.
त्यांच्या घरी ड्रोन आणि काही काचेचे तुकडे सापडले. मात्र, सुदैवाने त्यावेळी आवारात कोणीही उपस्थित नव्हते. ड्रोन हल्ल्याची जबाबदारी हिजबुल्लाहने घेतली आहे. इस्रायलकडे प्रगत हवाई संरक्षण यंत्रणा असूनही ते ड्रोनपासून सुरक्षित नाही, हे या घटनेने उघड केले होते.
हेही वाचा:





