Israeli Airstrikes on Gaza । इस्रायली लष्कराने गाझातील एका शाळेवर हवाई हल्ला केला असून ज्यात 57 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. तर या हल्ल्यात 73 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही शाळा संयुक्त राष्ट्रांची होती, ज्यामध्ये निर्वासितांना ठेवण्यात आले होते. पंधरा दिवसांतील हा तिसरा हल्ला आहे. गाझा येथील खान युनिस येथील नासेर रुग्णालय जखमींनी भरले आहे. आतापर्यंत तीन इस्रायलचे तीन हल्ले Israeli Airstrikes on Gaza । गेल्या आठवड्यातच इस्रायली सैन्याने पॅलेस्टिनींना खान युनूसला सोडण्याचे आदेश दिले होते. यानंतर त्याठिकाणी तीन मोठी रुग्णालये बंद करावी लागली. संयुक्त राष्ट्राने याला धोकादायक पाऊल म्हटले आहे. खान युनिसमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी आणखी वेळ द्यावा, असेही म्हटले आहे. या काळात इस्रायलने निर्वासितांवर हल्ले करू नयेत. इस्रायली लष्कराने 6 जून रोजी गाझामधील शाळांवर तीन हल्ले केल्याची माहिती दिली. इस्रायली सैन्याकडून आधी शाळेला घेराव अन् नंतर हल्ला Israeli Airstrikes on Gaza । आठवडाभरापूर्वी इस्रायली सैन्याने संयुक्त राष्ट्रांच्या शाळेवर हवाई हल्ला केला होता. इस्रायली सैन्याने 6 जुलै रोजी गाझामधील एका शाळेवर हवाई हल्ला केल्याचे सांगितले. 16 जणांचा मृत्यू झाला असून 75 हून अधिक जण जखमी झाले आहेत. अल जझीराच्या वृत्तानुसार, ही शाळा संयुक्त राष्ट्रांची होती, जिथे निर्वासितांना ठेवले जात होते. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, इस्रायली सैन्याने आधी शाळेला घेराव घातला आणि नंतर हल्ला केला. इस्रायलच्या हल्ल्यामुळे शाळेची इमारत कोसळली, त्यात राहणारी मुलं गाडली गेली. वाचलेल्या दोन मुलांपैकी एका मुलीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दुसऱ्या मुलाच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर अनेक जखमांच्या खुणा होत्या. यूएनच्या बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यातही इस्रायली लष्कराने एका शाळेला लक्ष्य केले होते.