इराणकडून २ इस्रायली एफ-३५ लढाऊ विमाने पाडल्याचा दावा ; IDF म्हणाले,”मुस्लिम देश खोटारडेपणा…”

Israel attacks Iran । इस्रायलवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने आज पहाटे इस्रायलचे दोन अपग्रेडेड एफ-३५ स्टेल्थ लढाऊ विमाने आणि अनेक ड्रोन पाडले आहेत. इराणच्या सर्वोच्च लष्करी कमांडर, अणुशास्त्रज्ञ आणि नागरिक (महिला आणि मुलांसह) यांच्या हत्येनंतर हा हल्ला करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. इराणने, हा हल्ला झिओनिस्ट राजवटीने म्हणजेच इस्रायलने केला आहे” असे म्हटले आहे.
लष्कराची अधिकृत पुष्टी Israel attacks Iran ।
इराणी लष्कराच्या जनसंपर्क कार्यालयाने एका अधिकृत निवेदनात, “देशाच्या हवाई संरक्षण युनिट्सनी या दोन एफ-३५ लढाऊ विमानांना आणि अनेक ड्रोनना यशस्वीरित्या लक्ष्य केले आणि नष्ट केले” असे म्हटले आहे. सध्या या विमानांच्या वैमानिकांचे काय झाले याची चौकशी सुरू आहे आणि अधिक माहिती सविस्तर लवकरच देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
एफ-३५ हे जगातील सर्वात प्रगत लढाऊ विमान मानले जाते
एफ-३५ हे सर्वात प्रगत पाचव्या पिढीतील लढाऊ विमान मानले जाते आणि ते स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. ते पाडणे हे कोणत्याही देशाच्या लष्करी शक्तीचे मोठे प्रदर्शन मानले जाते. अशा प्रकारचे विमान पाडणारा इराण हा पहिला देश ठरला आहे.
इस्रायलने हा दावा फेटाळला Israel attacks Iran ।
इस्रायली सैन्याने हे दावे पूर्णपणे फेटाळले आहेत. इस्रायल डिफेन्स फोर्स (आयडीएफ) चे अरबी प्रवक्ते अवीचाई अद्राई यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “इराणी मीडिया खोटेपणा पसरवत आहे. हे संपूर्ण वृत्त निराधार आहे.”
इराणी मीडियाच्या वृत्तानुसार, तेहरानने शुक्रवारी दोन इस्रायली एफ-३५ स्टेल्थ लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यांदरम्यान एक पायलट पकडण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे, जी एक महिला असल्याचे सांगितले जात आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, ही कारवाई इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेने केली आहे.
इराणचा हा दावा भारतातील इराणी दूतावासाने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर देखील शेअर केला आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, “इराणच्या हवाई संरक्षण दलाने दोन इस्रायली एफ-३५ लढाऊ विमाने पाडली आणि अनेक शत्रू ड्रोन रोखले.”
हेही वाचा
अग्रलेख : नाते अविश्वासाचे





