#ISL : मुंबई सिटीचा जमशेदपूर एफसीवर विजय

नवी दिल्ली : मुंबई सिटी एफसीने गुरूवारी झालेल्या इंडियन सुपर लीग स्पर्धेच्या सामन्यात जमशेदपूर एफसी संघाचा २-१ ने पराभव करत विजय नोंदविला.
.@bidya_official's first-ever #HeroISL goal gives @MumbaiCityFC the 3⃣ points and puts @JamshedpurFC out of top-four contention!#MCFCJFC #HeroISL #LetsFootball pic.twitter.com/5vOlTBBmcQ
— Indian Super League (@IndSuperLeague) February 6, 2020
जमशेदपूर संघाकडून ७ व्या मिनिटाला नोए एकोस्टाने पेनल्टीव्दारे गोल करत संघास १-० ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अमीन चेरमितीने ६० व्या मिनिटाला गोल करत मुंबई सिटी एफसी संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर विद्यानंदा सिंहने (९०+२) अतिरिक्त वेळेत गोल करत मुंबई सिटी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
Happy with how the #HeroISL table looks at the end of Gameweek 15? 🤔#LetsFootball pic.twitter.com/Gw49MULDqK
— Indian Super League (@IndSuperLeague) February 6, 2020
या विजयासह मुंबई सिटी एफसी संघाने ३ गुण मिळविले. त्याचा संघ १६ सामन्यातील २६ गुणांसह गुणतालिकेत चौथे स्थानी कायम आहे. दुसरीकडे या पराभवामुळे जमशेदपूर एफसी संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. जमशेदपूर संघाचे १५ सामन्यात १६ गुण झाले असून गुणतालिकेत ते ७ व्या स्थानी आहेत.




