Virat Kohli : ‘तो आमच्यासाठी चिकूच राहणार…’, विराट कोहलीच्या निवृत्तीवर इशांतची हृदयस्पर्शी प्रतिक्रिया

Ishant Sharma Shares Heartfelt Memories with Virat Kohli : भारताचा स्टार फलंदाज असलेल्या विराट कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा व विराट कोहली यांची चांगली मैत्री आहे. विराटबद्दल बोलताना इशांत शर्मा म्हणाला की, कोहली बाहेरील लोकांसाठी स्टार आहे. आम्ही अंडर-१७ मध्ये खेळलो आहोत. तो माझा बालपणीचा मित्र आहे, त्याची स्टार असलेल्या प्रतिमेपेक्षा तो खूप वेगळा आहे. त्यामुळेच तो मैत्री टिकवून ठेवणारा असल्याने, तो अजूनही आमच्यासाठी चिकूच आहे.
‘आम्ही एकत्र जेवायचो’ –
यावेळी बोलताना इशांत शर्माने विराट कोहली सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला की, “आम्ही जेव्हा अंडर-१९ मध्ये होतो, तेव्हा आम्ही आमच्याकडे किती पैसे आहेत ते मोजायचो. आम्ही एकत्र जेवायचो. जेव्हा आम्ही अंडर-१९ मध्ये खेळायला जायचो तेव्हा, आम्ही आमचा प्रवास भत्ता वाचवून सोबत घेऊन जायचो. म्हणूनच विराट कोहली प्रत्येकासाठी वेगळा आहे. तो माझ्यासाठीही वेगळा आहे.”
Your journey will inspire countless players on how to play this game the right way — with heart, hunger, and honour. Test cricket won’t be the same without you, Virat. Grateful to have shared so many moments together. @imVkohli 🤗 pic.twitter.com/0OrAGFVE4T
— Ishant Sharma (@ImIshant) May 12, 2025
‘मी त्याला आतून आणि बाहेरून ओळखतो’ –
“He could’ve played till 40!” – Ishant Sharma
Hear the pacer reflect on Virat’s sudden retirement from the whites. 🗣️✨
Watch the LIVE action ➡ https://t.co/r4DtdEwA63 #IPLonJioStar 👉 #DCvGT | SUN, MAY 18, 6:30 PM only on Star Sports 1, Star Sports 1 Hindi, Star Sports 2,… pic.twitter.com/or1g18gLXz
— Star Sports (@StarSportsIndia) May 17, 2025
इशांत म्हणाला की कोहलीच्या स्टारडम असूनही, त्यांचे नाते भावासारखे राहिले. तो म्हणाला, “कल्पना करा, तुमचा भाई इतक्या उंचीवर पोहोचला आहे. प्रत्येकजण त्याला महान मानत आहे. पण तुम्हाला दिसेल की, दिवसाच्या शेवटी तो एक माणूस आहे. मी त्याच्यासोबत बराच वेळ घालवला आहे. मी त्याला आतून आणि बाहेरून ओळखतो. तो कुठून आला आहे, तो कसा आहे आणि कसा नाही हे माहिती आहे.”
हेही वाचा – Roston Chase : रोस्टन चेसच्या हाती कसोटी संघाची कमान: ५०व्या सामन्यात भूषवणार कर्णधारपद!
विराट व इशांत या दोघांनीही २००० च्या दशकाच्या उत्तरार्धात आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. ज्यामध्ये इशांत कोहलीच्या अगदी आधी राष्ट्रीय संघात सामील झाला होता. त्याला तो क्षण आठवला जेव्हा कोहलीने त्याला भारतीय संघात त्याच्या समावेशाबद्दल सांगितले. इशांत म्हणाला, “माझी भारतीय संघात निवड झाली होती, तेव्हा त्यानेच मला सांगितले की, माझा समावेश भारतीय संघात झाला आहे. त्यावेळी मी झोपलेलो होतो. तो मला विचारत होता की, तू खरंच भारतासाठी खेळणार आहेस का? त्यावेळी माझी प्रतिक्रिया होती, की विराट भाई मला झोपू दे.” असा मिश्किल किस्सा देखील इशांतने सांगितला.





