Ishan Kishan Record : इशान किशनने पहिल्याच सामन्यात रचला नवा इतिहास! ‘हा’ रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच खेळाडू
Ishan Kishan Record : सनरायझर्स हैदराबादचा (SRH) नवा कर्णधार ईशान किशन याने आपल्या फलंदाजीने चिन्नास्वामी स्टेडियमवर अक्षरशः वादळ निर्माण केले

Ishan Kishan record as SRH Captaincy in IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा (SRH) नवा कर्णधार इशान किशन याने आपल्या फलंदाजीने चिन्नास्वामी स्टेडियमवर अक्षरशः वादळ निर्माण केले. नियमित कर्णधार पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्या इशानने आपल्या पहिल्याच कॅप्टन्सी पदार्पणात ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली आहे.
आयपीएल कारकिर्दीतील ११९ सामने खेळल्यानंतर अखेर इशान किशनला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले. आरसीबीविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात इशानने केवळ ३८ चेंडूत ८० धावांची तुफानी खेळी केली. २१०.५३ च्या स्ट्राईक रेटने खेळताना त्याने ८ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकार खेचले. या खेळीसह त्याने सनरायझर्स हैदराबादसाठी कर्णधार म्हणून पदार्पणात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
मोडला मनीष पांडेचा विक्रम –
𝙍𝙞𝙨𝙞𝙣𝙜 to the 𝘾𝙝𝙖𝙡𝙡𝙚𝙣𝙜𝙚 🫡
A phenomenal FIFTY on #TATAIPL captaincy debut for #SRH skipper @ishankishan51 🧡
Updates ▶️ https://t.co/Eo5z0jh4K4 #KhelBindaas | #RCBvSRH | @SunRisers pic.twitter.com/HbkY2NOQlF
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2026
यापूर्वी हा विक्रम मनीष पांडेच्या नावावर होता. २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध कर्णधार म्हणून पदार्पण करताना मनीषने नाबाद ६९ धावा केल्या होत्या. इशानने आता त्याला मागे टाकले आहे.
- हैदराबादसाठी ‘कॅप्टन्सी’ पदार्पणात सर्वाधिक धावा:
- इशान किशन: ८० धावा (विरुद्ध आरसीबी, २०२६)
- मनीष पांडे: ६९* धावा (विरुद्ध एमआय, २०२१)
- डेव्हिड वॉर्नर: ५३ धावा (विरुद्ध सीएसके, २०१५)
पॅट कमिन्सच्या जागी संधी –
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स सध्या दुखापतग्रस्त असल्याने तो या हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकला आहे. त्याच्या गैरहजेरीत हैदराबाद व्यवस्थापनाने इशान किशनवर विश्वास टाकला असून अभिषेक शर्माला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. इशान सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून नुकत्याच झालेल्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये त्याने ९ सामन्यांत १९३.२९ च्या स्ट्राईक रेटने ३१७ धावा कुटल्या होत्या. तोच फॉर्म त्याने आता आयपीएलमध्येही कायम ठेवला आहे.





