East Zone Champion : इशान किशनचा सुवर्णकाळ! १३ वर्षांनंतर ईस्ट झोनला मिळवून दिले दुलीप ट्रॉफीचे जेतेपद
East Zone Champion : इशान किशनच्या नेतृत्वाखाली ईस्ट झोन संघाने १३ वर्षांनंतर दुलीप ट्रॉफीच्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे.

Ishan Kishan Captains East Zone To Historic Duleep Trophy Title Win After 13 Years : युवा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनच्या (Ishan Kishan) नेतृत्वाखाली ईस्ट झोनने दुलीप ट्रॉफीच्या (Duleep Trophy 2026) फायनल सामन्यात नवा इतिहास रचला आहे. साऊथ झोनविरुद्धचा अंतिम सामना अखेर अनिर्णित सुटला असला, तरी पहिल्या डावातील भक्कम आघाडीच्या जोरावर ईस्ट झोनला अधिकृतपणे चॅम्पियन घोषित करण्यात आले. या ऐतिहासिक विजयासह ईस्ट झोनची तब्बल १३ वर्षांची विजेतेपदाची प्रतीक्षा संपुष्टात आली. कर्णधार इशान किशनने बॅटने ३५० धावांचा पाऊस पाडण्यासोबतच चतुर नेतृत्वाने संघाला जेतेपद मिळवून दिले.
१३ वर्षांनंतर दुलीप ट्रॉफीवर नाव; पुन्हा ठरला ‘प्लेअर ऑफ द मॅच’!
ईस्ट झोनने २०१३ नंतर पहिल्यांदाच या प्रतिष्ठेच्या देशांतर्गत करंडकावर आपले नाव कोरले आहे. यापूर्वी २०२५ मध्ये इशानने आपल्या कर्णधारपदाखाली झारखंडला प्रथमच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून दिली होती. त्या अंतिम सामन्याप्रमाणेच या बहुदिवसीय फायनलमध्येही इशानला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. दोन वेगवेगळ्या फॉरमॅटच्या फायनलमध्ये सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावून त्याने आपली उपयुक्तता पुन्हा सिद्ध केली.
🚨 Record Alert 🚨
East Zone Captain Ishan Kishan put on an absolute masterclass as he registered the most runs in a #DuleepTrophy match 👏👏 #EZvSZ | @ishankishan51 pic.twitter.com/QXRLzV2ecX
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 10, 2026
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून अद्याप अपराजित; १६ पैकी एकही सामना नाही गमावला!
𝙏𝙝𝙖𝙩 𝙒𝙞𝙣𝙣𝙞𝙣𝙜 𝙁𝙚𝙚𝙡𝙞𝙣𝙜 🏆
Congratulations to the Ishan Kishan-led East Zone on winning their third #DuleepTrophy title 👏👏#EZvSZ | @ishankishan51 pic.twitter.com/u6D4UvOTEp
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 10, 2026
इशान किशनच्या नेतृत्वाची आकडेवारी अचंबित करणारी आहे. त्याने आतापर्यंत १६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले असून त्यापैकी ८ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर ८ सामने अनिर्णित राहिले आहेत. याचाच अर्थ त्याच्या नेतृत्वाखाली संघाने एकही प्रथम श्रेणी सामना गमावलेला नाही. दुसरीकडे, साऊथ झोनचा कर्णधार तिलक वर्माने फायनलमध्ये ९९ धावांची झुंजार खेळी केली; मात्र ती ईस्ट झोनच्या धावसंख्येसमोर अपुरी ठरली.
हेही वाचा – IPL 2027 : MS धोनी IPL 2027 मध्ये खेळणार? CSK च्या खेळाडूने दिली मोठी अपडेट, म्हणाला…
पहिल्या डावात ७०८ धावांचा डोंगर; अखेर ३८८/७ वर सामना अनिर्णित!
Handshakes in the middle to conclude a fantastic Final 🤝
East Zone clinch the #DuleepTrophy 2026 title by virtue of first-innings lead 🏆#EZvSZ pic.twitter.com/4DJjNHkAHD
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 10, 2026
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ईस्ट झोनने पहिल्या डावात इशानच्या २७० धावांमुळे ७०८ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात साऊथ झोनचा पहिला डाव ३३६ धावांवर गारद झाला. इशानने फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात ईस्ट झोनने ७ बाद ३८८ धावा उभारल्या आणि एकूण आघाडी ७६० धावांवर नेत सामना अनिर्णित राखत जेतेपदावर थाटात शिक्कामोर्तब केले.





