SRH vs MI : अपील केले नसताना ‘आऊट’ देणे योग्य का? एमसीसीचा नियम काय सांगतो? जाणून घ्या

SRH vs MI Ishan Kishan Dismissal Explained Whats Is Mcc Rule : आयपीएल २०२५ मध्ये बुधवारी राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स सामन्यात एक विचित्र घटना घडली. इशान किशन बाद झाला, पण त्याची बाद होण्याची पद्धत खूपच असामान्य होती. इशान किशनने दीपक चहरचा चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू यष्टीरक्षक रायन रिकेलटनकडे गेला. रिकेल्टन आणि चहर यांनी झेलबादसाठी अपील केले नाही आणि पंच विनोद सेसन देखील हा चेंडू वाईड घोषित करणार होते. मात्र, अचानक इशान किशन मैदानाबाहेर जाऊ लागला.
अपील केले नसताना बाद देणे योग्य आहे का?
मुंबई इंडियन्सच्या कोणत्याही खेळाडूने अपील केले नसले, तरी त्याला वाटले की त्याच्या बॅटचा चेंडूला स्पर्श झाला आहे. पंचांनी ईशानला जाताना पाहिले आणि संकोच करत त्याला बाद दिले. नियमांनुसार, पंचांनी हे करायला नको होते. रिप्लेमध्ये असे दिसून आले की चेंडू इशानच्या बॅटला लागला नाही. एमसीसी नियम ३१.७ नुसार, पंचांनी फलंदाजाला परत बोलावायला हवे होते, कारण फलंदाजाचा गैरसमज झाला होता. या घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
🚨 ONE OF THE STRANGE MOMENT IN IPL HISTORY 🚨
– Not many MI player appealed.
– Ishan walked away.
– He thought there was an edge.
– Every MI player appreciated the decision of Ishan.
– But replay showed there was no Edge. pic.twitter.com/XhpoSP2EhJ— Johns. (@CricCrazyJohns) April 23, 2025
एमसीसीचा नियम काय सांगतो आणि पंचांनी काय करायला हवे होते?
🚨 ISHAN KISHAN DISMISSAL MOMENT 🚨 pic.twitter.com/y75dm8v0bM
— Johns. (@CricCrazyJohns) April 23, 2025
आयपीएल २०२५ मध्ये ही अनोखी घटना घडली. यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नियम योग्यरित्या अंमलात आणला गेला का? पंचांनी फलंदाजाला परत बोलावायला हवे होते का? नियमांनुसार, जर एखाद्या फलंदाजाचा गैरसमज झाला आणि तो मैदानाबाहेर गेला, तर पंचांनी त्याला परत फलंदाजीसाठी बोलावले पाहिजे. हे एमसीसीच्या नियम ३१.७ मध्ये लिहिले आहे. या नियमानुसार जर पंचांना असे वाटत असेल की फलंदाजाचा गैरसमज झाला आहे आणि बाद नसतानाही तो मैदानाबाहेर गेला आहे, तर पंचांनी हस्तक्षेप करावा. पंचांनी डेड बॉलचा संकेत द्यावा आणि फलंदाजाला परत बोलावावे.
हेही वाचा – SRH vs MI : मुंबई इंडियन्सचा सलग चौथा विजय! हैदराबादला दुसऱ्यांदा धूळ चारत टॉप-३ मध्ये पटकावले स्थान
एमसीसीच्या नियमात याबाबत काय आहे तरतूद?
या नियमात असे म्हटले आहे की पुढचा चेंडू टाकण्यापूर्वी पंचांनी हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. पण, जर ती डावाची शेवटची विकेट असेल तर नियम लागू होत नाही. इशान किशनच्या बाबतीत, पंचांनी नियमांचे पालन केले नाही. त्यांनी फलंदाजाला परत बोलावण्याची किंवा रिप्ले पाहण्याची संधी दिली नाही. त्याने फलंदाजाचे हावभाव पाहून त्याला बाद घोषित केले. या घटनेवर माजी क्रिकेटपटूंनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी पंच आणि इशान किशन दोघांवरही टीका केली आहे. त्याच्या मते इशानने डीआरएस घ्यायला हवा होता.





