Ishaan Khatter : “जय जीजस, श्री अल्लाह…”; धर्मावरुन प्रश्न विचारताच ईशान खट्टरने दिले प्रत्युत्तर
Ishaan Khatter : ईशान हा बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा सावत्र भाऊ

Ishaan Khatter : बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर (Ishaan Khatter ) सोशल मिडियावर सक्रिय असतो. नुकतेच त्याने इंस्टाग्रामवर ‘आस्क मी एनीथिंग’ सेशन घेतले. मात्र यादरम्यान एका युझरने थेट त्याच्या धर्मावरून डिवचलं. यावर संतापून न जाता किंवा वाद न घालता ईशानने अत्यंत रंजक उत्तर दिलं आहे. एका संवेदनशील विषयावरील उत्तरामुळे तो हायलाईट झाला आहे.
ईशानने या प्रश्नाचा स्क्रीनशॉट आपल्या स्टोरीवर शेअर केला आहे. ज्यात एका युझरने त्याला “भावा, तुझा धर्म नक्की कोणता आहे? मी खूप कन्फ्युज झालोय,” असा प्रश्न विचारला.
यावर त्याने लिहिलं, “जय जीजस, श्री अल्लाह, होली स्पिरिट दी फतेह!” इतकंच बोलून तो थांबला नाही, तर पुढे त्याने लिहिले, “निसर्ग, माणुसकी, दयाळूपणा आणि ही सृष्टी हाच माझा खरा धर्म आहे.” धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी हीच सर्वात श्रेष्ठ गोष्ट आहे, हे ईशानने आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे.
ईशानची आई मुस्लिम आणि वडील हिंदू (Ishaan Khatter)
ईशानचे कुटुंब वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीतून येते. त्याची आई नीलिमा अजीम या मुस्लिम कुटुंबातील आहेत, तर त्याचे वडील राजेश खट्टर हे पंजाबी हिंदू आहेत. अभिनेत्याच्या कुटुंबात विविधता राहिली आहे, ज्याचा प्रभाव त्याच्या विचारांमध्येही दिसून येतो.
ईशान हा बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा सावत्र भाऊ आहे. नीलिमा अजीम यांचे पहिले पती पंकज कपूर होते, ज्यांच्यापासून शाहिद कपूरचा जन्म झाला होता. पंकज कपूर यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर नीलिमा यांनी राजेश खट्टर यांच्याशी संसार थाटला आणि त्यांच्या पोटी ईशानचा जन्म झाला. पुढे हे दोघेही वेगळे झाले.
ईशानने कमी वयातच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्याने २००५ मधील ‘वाह! लाइफ हो तो ऐसी!’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. २०१७ मध्ये त्याने माजिद मजीदी यांच्या ‘बियॉन्ड द क्लाउड्स’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. Ishaan Khatter
यानंतर तो ‘धडक’, ‘खाली पीली’, ‘फोन भूत’ आणि ‘पिप्पा’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसला. अलीकडेच ‘होमबाउंड’ या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.
हेही वाचा:
Monsoon Update: मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार; तारीख समोर, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?







