‘हा खरंच आनंद आहे का?’ फटाक्यांच्या आवाजामुळे अभिनेत्री वैतागली; व्यक्त केला संताप

Karisma Tanna | दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात दिवाळीनिमित्त फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मात्र दिवाळीनंतर प्रदूषणात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे फटाके. प्रदूषणामुळे अनेक जण फटाके न फोडता दिवाळी साजरी करण्याचं आवाहन करतात. फटाक्यांमुळे सर्वसामान्यांसह अनेक मुक्या प्राण्यांना देखील त्रास होतो. आता बॉलीवूड अभिनेत्रीने फटाक्यांच्या त्रासाला कंटाळून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
अभिनेत्री करिश्मा तन्नानं इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी पोस्ट करत म्हटले की, ‘सकाळी ६ वाजता मला फटाक्यांच्या आवाजाने जाग आली. लोकं विश्रांती घेत असताना कोणीतरी मोठ्या आवाजात फटाके फोडत होतं. त्याच क्षणी माझ्या डोक्यात विचार आला, आपल्या आजुबाजूची हवा इतकी प्रदूषित झाली आहे, पाळीव प्राणी फटाक्यांमुळे होणाऱ्या मोठ्या आवाजामुळे घाबरून लपत आहेत. मग खरंच आपण सण साजरे करत आहोत का? हा खरंच आनंद आहे का? असा सवालही तिने उपस्थित केला आहे.
आनंद पसरवणं म्हणजे सण साजरा करणं
पुढे करिश्माने म्हटले की, “मोठा आवाज म्हणजे आनंद, धूर म्हणजेच उत्सव साजरे करणं, मुक्या प्राण्यांना घाबरवणं आणि स्वत:लासुद्धा धुराचा त्रास करून घेणं आपण आपल्या मुलांना हे शिकवतोय का? मुक्या प्राण्यांमध्ये भीती निर्माण करणं, प्रदुषण करणाऱ्या फटाक्यांपेक्षा आपण आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवणं, दिवे लावणं आणि सगळीकडे आनंद पसरवणं म्हणजे सण साजरा करणं ही जाणीव त्यांच्यात निर्माण केली पाहिजे. Karisma Tanna |
आपण अशी पिढी घडवूया ज्यांच्यासाठी सण म्हणजे आनंद आणि शांतता पसवरणं हे महत्वाचं असेल प्रदुषण करणं नाही. दरम्यान, ही पोस्ट थोडी उशिराच पोस्ट केली, पण काय करणार? हे फटाके थांबतच नाहीत, म्हणून पोस्ट शेअर करणं मला गरजेचं वाटलं.” असं देखील अभिनेत्रीने सांगितले आहे. Karisma Tanna |
करिश्मा तन्नाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘क्योंकी सांस कभी बहू थी’ मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री केली. तसेच तिने ‘कयामत की रात’, ‘पल्की’ आणि ‘नागिन- ३’ या मालिकांमध्ये देखील अभिनय केला आहे. तिनं ‘बिग बॉस ८’ आणि ‘खतरों के खिलाडी १०’सारखे काही शोदेखील केले आहेत. Karisma Tanna |
हेही वाचा :
“भाजप सरकारचा अमानवी आणि असंवेदनशील चेहरा उघड”; सातारा प्रकरणावर राहुल गांधींची प्रतिक्रिया





