करोनाला रोखण्यासाठी ‘डबल मास्क’ लावणं खरोखरच उपयुक्त आहे? जाणून घ्या…

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारचे उपाय वापरले जात आहेत. घराबाहेर पडताना लोकांना सतत ‘मास्क लावा’ असे आवाहनही लोकांना केले जात आहे. याक्षणी बाजारात विविध प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत जे तुम्हाला संसर्गापासून वाचविण्यात उपयुक्त ठरू शकतात.
कोरोनाची दुसरी लाट अधिक संक्रामक मानली जात आहे, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ यावेळी ‘डबल मास्किंग’ वर अधिक जोर देत आहेत. चला तर, जाणून घेऊया ‘डबल मास्किंग’ म्हणजे काय आणि संक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी हे किती प्रभावी ठरू शकते
अलीकडेच, यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) ने मास्कबद्दल काही खास गोष्टी नमूद केल्या आहेत, ज्या आपल्याला जाणून घेणे खूप महत्त्वाच्या आहेत. सीडीसीमधील तज्ञांनी लोकांना डबल मास्किंगचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. डबल मास्किंग म्हणजे दोन मास्क. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की असे केल्याने 90 टक्के संसर्ग करणारे थेंब (ड्रॉपलेट) टाळता येऊ शकतात.
* डबल मास्किंग कसे करावे?
सीडीसी तज्ञांच्या मते, डबल मास्किंगसाठी एक साधा आणि सर्जिकल मास्क घालता येतो. यासाठी, सर्वप्रथम, सर्जिकल मास्क चांगल्या प्रकारे लावा आणि त्यानंतर साधा किंवा दुसरा सर्जिकल मास्क त्यावर लावा. लक्षात ठेवा, आपले नाक आणि तोंड यामध्ये चांगले झाकलेले असावे.
* डबल मास्किंग कधी आवश्यक आहे?
तज्ञांच्या मते, यावेळी संसर्गाची गती वेगवान असल्याने, घराबाहेर पडताना याचा वापर केला पाहिजे, विशेषत: ज्या ठिकाणी गर्दी जास्त आहे अशा ठिकाणी. या व्यतिरिक्त प्रवासादरम्यान डबल मास्किंग आवश्यक आहे आणि जेथे सामाजिक अंतर पाळणे कठीण आहे,अशा ठिकाणीआवर्जून डबल मास्किंग करावे.
* एक मास्क का पुरेसा नाही?
तज्ञांच्या मते, ड्रॉपलेट रोखण्यासाठी सर्जिकल मास्क 56 टक्के प्रभावी असू शकतात. हे मास्क कडा दुमडून लावले तर ते सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद होऊन त्यांची कार्यक्षमता 77 टक्के पर्यंत वाढेल. दुसरीकडे, आपण दोन मास्क लावल्यास, ते ड्रॉपलेट रोखण्यासाठी 85 टक्के पर्यंत उपयुक्त ठरू शकतात. असे मास्क अजिबात लावू नका जे सैल असतात, किंवा योग्य फिटिंगचे नसतात.





