गॅस गीझर धोकादायक आहे का?

गॅस गीझरचा वापर बाथरूममध्ये गरम पाणीपुरवठय़ासाठी केला जातो. त्याचा वापर त्याच्या स्वस्तपणामुळे जास्त केला जातो. त्याची स्थापना स्वस्त असते आणि ते विजेचा वापर करत नाही. हे एलपीजी गॅस गीझर पुरेशा व्हेंटिलेटेड ठिकाणी नसल्यास कोंडतात आणि कार्बन डायऑक्साईड आणि नायड्रोजन डायऑक्साईडमुक्त करून तो गोळा करतात. एखादी व्यक्ती विशेषत: व्हेंटिलेशन नसलेल्या बाथरूममध्ये या वायूंच्या संपर्कात आल्यास तिचा जीव जाऊ शकतो.
सिंड्रोमची लक्षणे म्हणजे चक्कर येणे, आकडी येणे, बेशुद्ध पडणे आणि काळोखी येणे. दीर्घकाळ संपर्क आल्यामुळे एखादी व्यक्ती कोमात जाऊ शकते किंवा कार्बन डायऑक्साईडच्या विषबाधेमुळे तिला कार्डिएक अरेस्ट येऊ शकतो. इमर्जन्सी रूममध्ये (ईआर) नेल्यावर ब्लड गॅस अॅनालिसिस आणि इतर सर्वसाधारण तपासण्या इतर कारणे तपासण्यासाठी केली जातात. या प्रकरणांवर ऑक्सिजन थेरपीने उपचार केले जातात. ते मुख्यत्वे इआर फिजिशियन्स आणि न्यूरोलॉजिस्ट करतात; परंतु वेळेत उपचार न झाल्यास परिस्थिती जीवघेणी ठरू शकते किंवा दीर्घकालीन साईड इफेक्ट होऊ शकतात.
हे साधे घरगुती उपकरण नीट, पुरेशा पूर्वकाळजीसह वापरले नाही, तर अपंगत्व येणा-या न्यूरोलॉजिक परिस्थितीचे कारण ठरू शकते. अनेक लोकांना अगदी डॉक्टर आणि सामान्य माणसालाही याबाबत माहिती नाही. बाथरूममध्ये पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेशन देणे हे या परिस्थितीला टाळण्यासाठी मूलभूत पाऊल आहे. कार्बन मोनॉक्साइर्डच्या विषबाधेवर लक्ष ठेवा. जसे डोकेदुखी, भ्रांती जाणे, मळमळ आणि छातीत दुखणे इत्यादी.
आवश्यक उपाय
1. गॅस गीझरचा अनियंत्रित वापर थांबवणे ही काळाची गरज आहे. लावण्यात आल्यास ते बाथरूमच्या बाहेर असावेत आणि त्यासोबत पुरेसे व्हेंटिलेशन असावे आणि बाथरूममध्ये चांगले एक्झॉस्ट फॅन्स असावेत.
2. बाथरूममध्ये गेल्यावर प्रत्येक वेळी एक्झॉस्ट फॅन सुरू करा.
3. गीझर वेळोवेळी तपासत राहा.
4. गीझर सतत चालू ठेवू नका. दोन वापरांमध्ये अंतर ठेवा.





