Rajashree Landge : गाढवाचं लग्न’ पार्ट 2 येणार? अभिनेत्रीने दिली मोठी हिंट म्हणाली…
Rajashree Landge : अभिनेत्री राजश्री लांडगेला या चित्रपटामुळे मोठी लोकप्रियता मिळाली होती. मात्र, त्यानंतर ती फारशी चित्रपटांमध्ये दिसली नाही.

Rajashree Landge : मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या विनोदी चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘गाढवाचं लग्न’ चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं. मकरंद अनासपुरे आणि राजश्री लांडगे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत ‘गंगी’ हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री राजश्री लांडगे हिने एक मोठी हिंट दिली आहे.
अभिनेत्री राजश्री लांडगे हिने एका मुलाखतीत, ‘गाढवाचं लग्न पार्ट 2’ या चित्रपटावर काम सुरू आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी या प्रकल्पाला प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे गाढवाचं लग्न 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा अधिकृत मानली जात आहे.
गाढवाचं लग्न 2 विषयी बोलताना राजश्री म्हणाली, “पार्ट 2 बाबत आम्ही काम करत आहोत. चित्रपट कधी येणार याबाबत अद्याप काही ठरलेले नाही. मात्र, हा प्रकल्प साकार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.” (Rajashree Landge )
हेही वाचा : Pawanraje Nimbalkar Case: ओमराजे निंबाळकरांना धक्का! पवनराजे प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
अभिनेत्री राजश्री लांडगेला या चित्रपटामुळे मोठी लोकप्रियता मिळाली होती. मात्र, त्यानंतर ती फारशी चित्रपटांमध्ये दिसली नाही. त्यामुळे तिने सिनेसृष्टी सोडली का, असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला होता. “मी कधीच कलाक्षेत्र सोडलेले नाही. मात्र, काही गैरसमज आणि अफवांमुळे अनेक वर्षे लोकांना स्पष्टीकरण देण्यातच गेली असल्याचे अभिनेत्रीने सांगितले.

Rajashree Landge : गाढवाचं लग्न’ पार्ट 2 येणार? अभिनेत्रीने दिली मोठी हिंट म्हणाली…
सिनेसृष्टीतून दूर राहण्यामागचे कारण सांगताना अभिनेत्री म्हणाली की, वडिलांच्या निधनानंतर गावातील सामाजिक आणि शैक्षणिक कामांची जबाबदारी स्वतःवर आली. त्यामुळे मुंबई आणि गाव अशा दोन्ही ठिकाणी वेळ देत आहे. मीडिया व्यवस्थापन, पार्ट्या आणि इंडस्ट्रीतील नेटवर्किंग यामध्ये आपण कधीच रमलो नाही, महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे निस्वार्थ प्रेम हीच आपली खरी ताकद असल्याचे सांगत अभिनेत्रीने चाहत्यांप्रती असलेली प्रेमाची भावना व्यक्त केली. (Rajashree Landge )
सध्या राजश्री लांडगे सामाजिक कार्यात सक्रिय असून, तिच्या पुनरागमनाची आणि ‘गाढवाचं लग्न पार्ट 21’ची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
हेही वाचा : Cocktail 2 Box Office : दमदार ओपनिंग! पहिल्याच दिवशी मोडला जुन्या ‘कॅाकटेल’चा विक्रम, किती कमाई केली?





