Nepal Flood Made in China: नेपाळमधील पूरपरिस्थितीला चीन जबाबदार? Make in Chinaच्या आरोपावर दिले उत्तर…
Nepal Flood Made in China:

Nepal Flood Made in China: नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात आलेल्या भीषण महापूर आणि भूस्खलनानंतर चीनच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात होते. तिबेटमधून येणाऱ्या पुराच्या धोक्याबाबत चीनने वेळेवर नेपाळला पूर्वसूचना दिली नाही, असा आरोप केला जात आहे. नेपाळमधील पूरपरिस्थितिला जबाबदार धरण्यात आल्यानंतर चीनने अधिकृत निवेदन जारी करून हे सर्व दावे फेटाळले आहेत.
चिनी दूतावासाने स्पष्ट केले की, चीनकडून धोक्याचा इशारा न मिळणे किंवा चीनच्या बाजूचा नैसर्गिक धरणाचा बांध फुटल्याने नेपाळचे नुकसान झाले, हे दावे पूर्णपणे खोटे आहेत. या संकटासाठी चीनला जबाबदार धरणे चुकीचे आहे. अशा आरोपांमुळे मदतकार्यात कोणताही फायदा होणार नाही, तर परस्पर सहकार्यामुळेच लोकांचे प्राण वाचू शकतात, अशी भूमिका बीजिंगने घेतली आहे.
Glowing Skin: सेलिब्रिटींसारखी ग्लोइंग स्किन हवीये? रोजच्या रुटीनमध्ये करा ‘या’ ७ सोप्या गोष्टी
२६ ऑगस्ट २०२६ च्या सकाळी स्वतः नेपाळच्या बाजुने भूकंप किंवा भूकंपसदृश परिस्थितीमुळे एका मोठ्या हिमनदीचा भाग कोसळला. हिमनदी कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर चिखल, दगड आणि मातीचा महाकाय प्रवाह सुरू झाला. या अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे ग्यिरॉन्ग-रसुवागढी सीमा भागात केवळ नेपाळचेच नव्हे, तर चीनच्या हद्दीतील लोकांचेही मोठे नुकसान झाले असून अनेक नागरिक बेपत्ता झाले आहेत, असे चिनी दूतावासाने स्पष्ट केले आहे.
— Spokesperson Of Chinese Embassy In Nepal (@PRCSpoxNepal) August 27, 2026
ही दुर्घटना सीमेच्या दोन्ही बाजूंच्या भौगोलिक रचनेवर आदळलेली एक सामूहिक नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी दोन्ही देशांनी मिळून मदत व बचावकार्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे चीनने म्हटले आहे.
पुरामुळे चीनमध्येही मोठं नुकसान
तर चीनचे राजदूत झांग माओमिंग यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, “पुराममध्ये चीन आणि नेपाळमधील अनेकांचा मृत्यू झाला आहे. तसेच आर्थिक नुकसान देखील झालं आहे. पुरामुळे चीनमध्येही मोठं नुकसान झालं आहे. या व्यतिरिक्त बिजिंगमधून नेपाळसाठी आपत्कालीन मदत साहित्य आणि आर्थिक मदतीची व्यवस्था करण्यात आली आहे. या कठीण काळात चीन नेपाळच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.’ Nepal Flood Made in China
Deeply saddened by the devastating natural disaster in the Gyirong–Rasuwagadhi border region, which has caused significant casualties and losses on both the Chinese and Nepali sides.
My deepest condolences to those who lost their lives, and my sincere sympathies to their…
— Ambassador Zhang Maoming (@PRCAmbNepal) August 27, 2026
पुढे झांग माओमिंग म्हणाले, ‘चीन नेपाळला सर्वोतपरी मदत करण्याचा प्रयत्न करेल. आम्ही विश्वास व्यक्त करतो की, दोन्ही देश मिळून संकटातून बाहेर पडतील. या पूरस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी काम करत राहील’. तसेच राजदूत माओमिंग यांनी ग्यिरॉन्ग-रसुवागढी सीमा भागात ओढवलेल्या या संकटाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त केली.
दरम्यान, अधिकृत आकडेवारीनुसार, नेपाळमधील आतापर्यंत १५७ नागरिकांचा मृत्यू झाला असून, तब्बल ४०३ नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. चीनच्या हद्दीतही परिस्थिती गंभीर असून सुमारे २६५ नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. Nepal Flood Made in China
हेही वाचा:
Glowing Skin: सेलिब्रिटींसारखी ग्लोइंग स्किन हवीये? रोजच्या रुटीनमध्ये करा ‘या’ ७ सोप्या गोष्टी





