IND vs IRE 1st T20I : क्रिकेट विश्वात मोठा उलटफेर! दुबळ्या आयर्लंडने टीम इंडियाचा धुव्वा उडवत नोंदवला ऐतिहासिक विजय
IND vs IRE 1st T20I : आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात आयर्लंडने भारताला हरवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

IND vs IRE 1st T20I Result Ireland Beat India by 34 runs : नुकताच टी-२० विश्वविजेता बनलेल्या टीम इंडियाला आयर्लंडविरुद्धच्या पहिल्याच टी-२० सामन्यात अत्यंत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आयर्लंडने भारताचा ३४ धावांनी धुव्वा उडवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात आयर्लंडने भारताला हरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या खळबळजनक विजयासह आयर्लंडने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी ऐतिहासिक आघाडी घेतली आहे. नव नियुक्त कर्णधार श्रेयस अय्यरचा हा कर्णधार म्हणून पहिलाच सामना होता, जो अत्यंत कटू ठरला.
खराब सुरुवातीनंतर आयर्लंडची जोरदार मुसंडी –
सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. संघाने ७.१ षटकात अवघ्या ५१ धावांवर आपले ४ मुख्य फलंदाज गमावले होते. मात्र, यानंतर कर्णधार लॉर्कन टकर (५० धावा) आणि गॅरेथ डेलानी (४९ धावा) यांनी पाचव्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला.
IRE vs IND: Matthew Hollard picks three wickets as Ireland beat India by 34 runs in the 1st T20I at Civil Service Cricket Club in Belfast on Friday. This is also Ireland’s first win against India in any format pic.twitter.com/m90TJTwZHm
— IANS (@ians_india) June 26, 2026
जॉर्ज डॉकरेलने १० चेंडूंत १९ धावांचे योगदान दिल्याने आयर्लंडने २० षटकांत ९ बाद १८२ धावांचा आव्हानात्मक पल्ला गाठला. भारताकडून वेगवान गोलंदाज हर्षित राणाने ३ आणि अर्शदीप सिंगने २ विकेट्स घेतले. मात्र, प्रसिध कृष्णा (४ षटकात ५७ धावा) आणि वॉशिंग्टन सुंदर (१ षटकात १९ धावा) अत्यंत महागडे ठरले.
🚨 1st T20I IND vs IRE 🚨
INDIA 🇮🇳 : 1️⃣4️⃣8️⃣-🔟 (18.5 Overs)
Abhishek : 5️⃣0️⃣²⁰
Shivam : 2️⃣5️⃣¹⁴• Hollard : 3️⃣-2️⃣8️⃣⁴
IRELAND 🇮🇪 WON BY 3️⃣4️⃣ RUNS#INDvIRE #IREvIND #INDvsIRE #India #Irelandpic.twitter.com/5DcGygJQHR https://t.co/bnrhGZhOfM
— Cricket Lover 🏏 (@Crick97924Lover) June 26, 2026
भारतीय फलंदाजांचे लोटांगण; अभिषेक शर्माचे वेगवान अर्धशतक व्यर्थ-
🚨 SHOCKING RESULT! 🚨
🇮🇪 Ireland defeat India by 34 runs in the 1st T20I. 💔🏏
A disappointing outing for Team India.
[Team India, IRE vs IND, Ireland] pic.twitter.com/kSSZgvHgv6
— Game Changers (@Game_Changerrs) June 26, 2026
प्रत्युत्तरात १८३ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना भारतीय संघाची फलंदाजी पत्त्यांच्या घरासारखी कोसळली. दुसऱ्याच षटकात संजू सॅमसन बाद झाला. सलामीवीर अभिषेक शर्माने अवघ्या १९ चेंडूंत अर्धशतक झळकावून आशा उंचावल्या, पण २० व्या चेंडूवर तो ५० धावा करून बाद झाला. यानंतर इशान किशन (१) आणि स्वतः कर्णधार श्रेयस अय्यर (३) स्वस्तात बाद झाले.
उपकर्णधार तिलक वर्माने १९ आणि शिवम दुबेने २५ धावा केल्या, तर अक्षर पटेलने काही काळ संघर्ष केला. मात्र, भारताचा डाव १९ व्या षटकात अवघ्या १४८ धावांवर आटोपला. आयर्लंडकडून पदार्पण करणाऱ्या मॅथ्यू हॉलार्डने २८ धावांत ३ विकेट्स घेतल्या, तर भारतीय वंशाच्या जय मुंदडाने २६ धावांत २ विकेट्स घेत भारताचे कंबरडे मोडले. मॅथ्यू हम्फ्रीजनेही ३ गडी बाद केले.





