IRE-W vs ENG-W 2nd T20 : आयर्लंडच्या महिला संघानं रचला इतिहास, T20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिल्यांदाच इंग्लंडला केलं पराभूत….

Ireland Women vs England Women – इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ आयर्लंडचा दौऱ्यावर होता. यामध्ये ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि 2 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली गेली. इंग्लंडने एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली, तर टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात आयर्लंडच्या महिला संघाने इतिहास घडवला आहे. आयर्लंडने प्रथमच टी-20 सामन्यात इंग्लंडला हरवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
आयर्लंडच्या महिला संघाने इंग्लंडच्या महिला संघाला प्रथमच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पराभूत करून शानदार कामगिरी केली आहे आणि इतिहास रचला आहे. दुसऱ्या T20I सामन्यात आयर्लंडच्या महिला संघाने इंग्लंडच्या महिला संघाचा 5 गडी राखून पराभव केला.
आयर्लंडच्या महिला संघाने याआधी कधीही टी-20 फॉरमॅटमध्ये इंग्लंडला हरवले नव्हते. पण कर्णधार गॅबी लुईसच्या नेतृत्वाखाली आयर्लंडने इतिहास घडवला आणि पहिला टी-20विजय मिळवला. या सामन्यात आयर्लंडच्या खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही आयरिश संघाने चमकदार कामगिरी केली आणि 1 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 8 गडी गमावून 169 धावा केल्या. इंग्लंडकडून सलामीवीर म्हणून ब्रायोनी स्मिथने 26 चेंडूत 28 धावा केल्या, तर टॅमी ब्युमॉन्टने 34 चेंडूत 40 धावा केल्या. याशिवाय सेरेन स्मॉल 10 चेंडूत 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. तर पेज स्कॉलफिल्डने 21 चेंडूत 34 धावा केल्या. इंग्लंडला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेण्यात संघातील सर्व खेळाडूंनी योगदान दिले.
YES!!! A famous win in Clontarf! 🎉
We defeat England for the first time in a T20I! 🙌
▪️ England 169-8 (20 overs)
▪️ Ireland 170-5 (19.5 overs)SCORE: https://t.co/fvaBNHlTFc
MATCH PROGRAMME: https://t.co/QezDHP01u5
WATCH: Virgin Media Two in ROI
WATCH: TNT Sports in UK… pic.twitter.com/xJzk2cjbc1— Ireland Women’s Cricket (@IrishWomensCric) September 15, 2024
त्यानंतर ऑर्ला प्रेंडरगास्टने (Orla Prendergast)आयर्लंडसाठी उत्कृष्ट अर्धशतकी खेळी खेळली आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडच्या महिला संघाची सुरुवात खूपच खराब झाली. जेव्हा सलामीवीर ॲमी हंटर अवघी एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतली.
यानंतर गॅबी लुईस आणि ओरला प्रेंडरग्रास्ट यांनी धावा काढण्याची जबाबदारी घेतली. मात्र नंतर गॅबी लुईस 38 धावा करून बाद झाली. ऑर्लाने आपल्या फलंदाजीने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. तिने 51 चेंडूत 13 चौकारांसह 80 धावा केल्या. लेआ पॉलने 27 धावा केल्या. या फलंदाजांमुळेच आयर्लंडच्या महिला संघाने 19.5 षटकांत लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. इंग्लंडकडून केट क्रॉस आणि मॅडी व्हिलियर्सने प्रत्येकी दोन गडी बाद केले. बाकीचे गोलंदाज फ्लॉप झाले आणि त्यांना सामन्यात फारसा प्रभाव पाडता आला नाही.





