इराणचा ‘तो’ विनाशकारी संदेश अन् ट्रम्पचा संताप ; बी-२ बॉम्बर्सने अणुऊर्जा केंद्रावर केला हवाई हल्ला, नेमकं काय होत संदेशात ?

Iran’s threat to America । इराण आणि इस्रायलच्या युद्धत आता थेट अमेरिकेने एन्ट्री केल्याने हे युद्ध आणखी प्रखर होणार असल्याचे दिसत आहे. त्यातच अमेरिकेने इराणवर काल मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. दरम्यान, अमेरिकेच्या हवाई हल्ल्यापूर्वी इराणने अमेरिकेला धमकीचा संदेश पाठवला होता. या संदेशात इराणने,” जर त्यांच्या अणु तळांवर हल्ला झाला तर ते अमेरिकेत लपलेले स्लीपर सेल सक्रिय करतील” असा इशारा दिला होता.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात कॅनडामध्ये झालेल्या जी७ परिषदेदरम्यान ट्रम्प यांना हा इशारा देण्यात आला होता. हा संदेश मिळाल्यानंतर ट्रम्प १६ जून रोजी सकाळी परिषदेतून लवकर परतले आणि इस्रायल-इराण युद्ध झाल्यास त्यांच्या लष्करी पर्यायांचा विचार केला,असे सांगण्यात येत आहे.
अमेरिकेतील सुरक्षा संस्था हाय अलर्टवर Iran’s threat to America ।
इराणच्या धमकीनंतर, अनेक प्रमुख शहरांचे अमेरिकन प्रशासन आणि सुरक्षा संस्था हाय अलर्टवर आहेत. न्यू यॉर्क, वॉशिंग्टन डीसी, लॉस एंजेलिस आणि शिकागो सारख्या शहरांमध्ये सुरक्षा कडक करण्यात आली आहे. या शहरांमध्ये दहशतवादी कारवायांची भीती व्यक्त केली जात आहे. जर इराणने खरोखरच अमेरिकेत स्लीपर सेल नेटवर्क सक्रिय केले तर ते सुरक्षेसाठी मोठा धोका ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
ओमान आणि पाकिस्तानकडून चिंता व्यक्त Iran’s threat to America ।
पाकिस्तान आणि ओमानसारख्या देशांनी इराणच्या अणुस्थळांवर अमेरिकेच्या हवाई हल्ल्याबद्दल गंभीर चिंता आणि मतभेद व्यक्त केले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “मी इराणवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. या हल्ल्यात जीव गमावलेल्यांसाठी मी इराणी जनतेप्रती माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो. हा हल्ला अत्यंत बेजबाबदार आणि चिंताजनक आहे.”
इस्लामिक देशांच्या शांततापूर्ण संबंधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे ओमान देखील अमेरिकेच्या कारवाईवर खूप संतप्त दिसून आले. ओमानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, “हा हल्ला एक बेकायदेशीर पाऊल आहे, जो आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उघड उल्लंघन आहे. ओमान नेहमीच या प्रदेशात शांतता, स्थिरता आणि संवादाच्या बाजूने उभा राहिला आहे.” ओमानने असेही आठवण करून दिली की ते इराण आणि पाश्चात्य देशांमधील मध्यस्थीची भूमिका बऱ्याच काळापासून बजावत आहे आणि ही प्रतिक्रिया देखील या जबाबदारीनुसार आहे.





