इराणच्या आण्विक वाटाघाटी स्थगित; युरोपीय संघाकडून चिंता व्यक्त

व्हिएन्ना – इराणच्या आण्विक क्षमतेला नियंत्रित करण्यासाठी 2015 मध्ये करण्यात आलेल्या आण्विक कराराला पुनरुज्जीवित करण्यासाठी जागतिक नेत्यांबरोबर सुरू असलेली चर्चा शुक्रवारी अचानक स्थगित करण्यात आली.
इराणकडून वाटाघाटीत सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींना इराणने चर्चेसाठी माघारी बोलावून घेतले. त्यामुळे ही चर्चा स्थगित झाली. तालिबानकडून या चर्चेदरम्यान नवीन अटी मांडण्यात आल्यामुळे इराणने ही चर्चा स्थगित केली.
मात्र प्रगतीपथावर असलेली ही चर्चा स्थगित करण्यात आल्याबद्दल युरोपीय संघाने चिंता व्यक्त केली आहे. या चर्चेत काय प्रगती झाली होती, हे मात्र युरोपीय संघाच्या प्रतिनिधींनी सांगितले नाही. ही चर्चा पुन्ह लगेचच सुरू होईल, अशी आशा सहभागी होणाऱ्या सदस्यांनी व्यक्त केली मात्र त्यासाठीची नेमकी कालमर्यादा स्पष्ट केली गेलेली नाही. ही चर्चा याच वर्षी पुन्हा सुरू होईल, अशी आशा चीनने व्यक्त केली. तर युरोपीय संघाचे प्रतिनिधी एनरिक मोरा यांनीही तशीच अपेक्षा व्यक्त केली आहे.
इराणमधील कट्टरवादी नव्या सरकारमुळे या चर्चेला 5 महिन्यांचा खंड पडला होता. मात्र 29 नोव्हेंबरपासून ही चर्चेची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली होती. अमेरिकेने 2018 मध्ये या करारातून माघार घेतली आहे. मात्र ज्यो बायडेन यांनी पुन्हा या करारात सहभागी होण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे या चर्चेत अमेरिका अप्रत्यक्षपणे सहभागी होत आहे.





